भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे रस्ते कामाचे भूमिपूजन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी वैशाली पाटील, शिवाजी देसाई, अशोक सटाले, गणेश आलुगडे, शशिकांत सुतार, राहुल सागुळे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : भाटशिरगावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपये खर्चाच्या वळण रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, तसेच डोंगरी विकास निधीतून दहा लाख रुपये खर्चाच्या कुरणे, पाणंद खडीकरण व मुरुमीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
चिखली व विश्वासराव नाईक कारखान्याशेजारील गाव म्हणून विकासात भाटशिरगावला नेहमी झुकते माप दिले आहे. येथील बहुतांशी विकासकामे मार्गी लावण्यासाठी व सोयीसुविधेसाठी प्रयत्न केले आहेत, असेही ते म्हणाले.
गणेश आलुगडे यांनी स्वागत केले. आ. नाईक यांच्या हस्ते रस्त्याचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी सरपंच वैशाली आलुगडे, उपसरपंच शिवाजी देसाई, सदस्य अशोक सटाले, शशिकांत सुतार, राहुल सागुळे, राजराणी देसाई, महादेव माने, आनंदा सटले आदी उपस्थित होते.