शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

कोरोना रूग्णांची संख्या जास्त असलेल्या भागात कंटेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 19:03 IST

CoronaVIrus In Sangli : कोरोना संसर्ग अधिक फैलावू नये व बाधित रूग्ण त्वरीत उपचाराखाली आणण्यासाठी कोरोना चाचणी मोठ्या प्रमाणात वाढविणे अत्यंत आवश्यक असून आरटीपीसीआर तपासणी वाढवावी. ज्या भागात कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे तेथे बॅरिकेटींग करून कंटेनमेंट झोन करून प्रभावी अंमलबजावणी करावी. त्या परिसरातील व हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींची कोरोना चाचणी त्वरीत करावी, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

ठळक मुद्देहाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींची कोरोना चाचणी त्वरीत कराजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले सक्त निर्देश

सांगली : कोरोना संसर्ग अधिक फैलावू नये व बाधित रूग्ण त्वरीत उपचाराखाली आणण्यासाठी कोरोना चाचणी मोठ्या प्रमाणात वाढविणे अत्यंत आवश्यक असून आरटीपीसीआर तपासणी वाढवावी. ज्या भागात कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे तेथे बॅरिकेटींग करून कंटेनमेंट झोन करून प्रभावी अंमलबजावणी करावी. त्या परिसरातील व हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींची कोरोना चाचणी त्वरीत करावी, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

ग्राम दक्षता समितीने होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्ती घराबाहेर पडणार नाहीत तसेच गावांमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलीस प्रशासनेही याबाबत होम आयसोलेशनमधील व्यक्तींना नोटीस बजावून होम आयसोलेशनचे पालन योग्य प्रकारे होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज खानापूर तालुक्यातील मंगरूळ व खंबाळे येथील कम्युनिटी आयसोलेशन सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र विटा येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, विटा येथील कोरोना चाचणी केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर येथे प्रत्यक्ष भेट देवून पहाणी केली.

तसेच तेथील कोरोना रूग्ण स्थितीचा व रूग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी विटा संतोष भोर, तहसिलदार ऋषिकेश शेळके यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, सर्कल, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतींचे सदस्य, तलाठी आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कम्युनिटी आयसोलेशन सेंटर मध्ये अधिक चांगल्या सुविधा द्याव्यात. होम आयसोलेशन मधील रूग्ण घराबाहेर पडू नयेत यासाठी वेळोवेळी भेटी देवून तपासणी करावी. जास्तीत जास्त कोरोना बाधित व्यक्तींना कम्युनिटी आयसोलेशन सेंटर मध्ये ठेवा. सामुहिक कार्यक्रमामुळे कोरोना संसर्ग अधिक पसरण्याची शक्यता असल्याचे असे कार्यक्रम होणार नाहीत याची सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, पोलीस पाटील यांनी दक्षता घ्यावी.

गावात कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही याबाबत गावातील लोकांचीही जबाबदारी आहे. होम आयसोलेशन मधील व्यक्तींचे स्टॅम्पिंग सुरू करावे. लसींच्या उपलब्धतेनुसार लस पुरवठा करण्यात येत असून लसीचा दुसरा डोस असणाऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड रूग्णांच्या उपचारासाठी पुरेशा प्रमाणात औषध साठा उपलब्ध ठेवावा.

काही पोस्ट कोविड रूग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासते यासाठी ग्रामीण रूग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देण्यात आले आहेत ते गरजू रूग्णांना मोफत वापरासाठी द्यावेत. त्याचा वापर संपल्यानंतर ते परत घ्यावेत. याचे व्यवस्थापन गट विकास अधिकारी यांनी करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कम्युनिटी आयसोलेशन सेंटर मधील रूग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांना मिळणारी औषधे, आरोग्य तपासणी व विविध सोयी सुविधांबद्दल विचारणा करून त्यांना धीर दिला. तसेच कम्युनिटी आयसोलेशन सेंटरमध्ये देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली