शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत युवकांच्या स्वच्छता मोहिमेचे द्विशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 16:13 IST

एका दिवसाची औपचारिकता दाखवून स्वच्छतेचा गाजावाजा करणाऱ्यांच्या गर्दीत युवकांची एक संघटना आपल्या सातत्यपूर्ण मोहिमेतून चमकत आहे. तब्बल २00 दिवस सलग स्वच्छता मोहिम राबविण्याचा विक्रम त्यांनी सांगलीमध्ये नोंदविला आहे. यामध्ये अनके गलिच्छ वस्त्यांना त्यांनी सुंदरतेचे वरदानही दिले.

ठळक मुद्देसांगलीत युवकांच्या स्वच्छतामोहिमेचे द्विशतककामाचे कौतुक : अनेक गलिच्छ भागांचे रुपडे पालटले

सांगली : एका दिवसाची औपचारिकता दाखवून स्वच्छतेचा गाजावाजा करणाऱ्यांच्या गर्दीत युवकांची एक संघटना आपल्या सातत्यपूर्ण मोहिमेतून चमकत आहे. तब्बल २00 दिवस सलग स्वच्छता मोहिम राबविण्याचा विक्रम त्यांनी सांगलीमध्ये नोंदविला आहे. यामध्ये अनके गलिच्छ वस्त्यांना त्यांनी सुंदरतेचे वरदानही दिले.स्वच्छ सांगली, सुंदर सांगली, कचरामुक्त सांगली या संकल्पनेचा निर्धार करून १ मे महाराष्ट्र दिनापासून निर्धार संघटनेच्यावतीने स्वच्छता मोहीम सुरू केली होती. या मोहिमेस दोनशे दिवस पूर्ण झाले आहेत.

यानिमित्त सांगलीच्या कॉलेज कॉर्नर परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांनी सहभागी होऊन श्रमदान केले. येथील दुभाजकाची स्वच्छता व रंगरंगोटीही करण्यात आली.नावाप्रमाणे या संघटनेने स्वच्छतेचा निर्धार करीत त्याची अंमलबजावणीही केली. केवळ एकच दिवस नव्हे तर सलग दोनशे दिवस हे तरुण शहर स्वच्छतेसाठी राबत आहेत. दैनंदिन स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या महपाालिकेप्रमाणे हे तरुण राबत आहे.

दीडशे दिवस पूर्ण झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी या तरुणांच्या अभियानाला दाद देत स्वत: सहभाग घेतला होता. त्यांच्या या कार्याचे कौतुक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.

केवळ महापालिकेला दोष देत बसण्यापेक्षा नागरिकांचे लाखो हात उत्स्फूर्तपणे स्वच्छतेत गुंतावेत यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी दिवसातून १ तास वेळ काढून आपापला परिसर स्वच्छ ठेवावा. निर्धार संघटनेच्या या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही या तरुणांमार्फत करण्यात येत आहे.निर्धार संघटनेचे अध्यक्ष राकेश दड्डण्णावर म्हणाले की, संत गाडगेबाबा व महात्मा गांधीजी यांच्या विचारांपासून प्रेरित होऊन आपला परिसर, गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आम्ही ही स्वच्छता यात्रा सुरू केली. आम्ही स्वच्छतेचे कार्य अखंडितपणे सुरू ठेवले आहे.

दररोज ४-५ किंवा जे काही युवक असतील त्यांना सोबत घेऊन, प्रसंगी एकटे असतानाही हे स्वच्छतेचे कार्य सुरू आहे. सोशल मीडियाच्या योग्य उपयोगामुळे दररोज युवक या अभियानात सहभागी होत आहेत. नागरिकांचाही या मोहिमेस पाठींबा मिळत आहे.

वास्तविक एक अभियान म्हणून नव्हे तर दैनंदिन कर्तव्य म्हणून नागरिकांमध्ये स्वच्छतेची बाब रुजली पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या मोहिमेत सातत्य ठेऊन आम्ही असे करता येऊ शकते हे दाखवून देत आहोत.सेल्फी पॉर्इंटचा प्लस पॉर्इंटसांगलीत विकसीत केलेला सेल्फी पॉर्इंट स्वच्छता अभियानाचा एक प्लस पॉर्इंट ठरत आहे. त्यामुळे तरुणाईला असे सुंदर रचनात्मक परिसर निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. आम्ही यापुढेही शहरात ठिकठिकाणी असे सेल्फी पॉर्इंट विकसीत करून त्या त्या भागातील तरुणांना त्यासाठी प्रोत्साहीत करणार असल्याचे दड्डण्णावर यांनी सांगितले.

टॅग्स :Selfieसेल्फीSangliसांगली