शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार व्यापाऱ्यांना सांगलीत बेदाणा सौद्यात बंद, बाजार समितीचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 18:06 IST

बेदाणा असोसिएशनकडूनही १०० टक्के वसुलीवर ठाम

सांगली : बेदाणा व्यापाऱ्यांकडून अजूनही शून्य पेमेंट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी असोसिएशनने शून्य पेमेंट पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांना सौद्यात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली बाजार समिती सचिव महेश चव्हाण यांनीही शून्य पेमेंटचे पत्र देणाऱ्यांनाच सौद्यात सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. दरम्यान, शंभर टक्के शून्य पेमेंट केलेल्या व्यापाऱ्यांना बेदाणा सौद्यात सहभाग देऊन दि. २९ नोव्हेंबरपासून सौदे सुरू होणार आहेत.सांगली, तासगाव आणि पंढरपूर येथील बेदाणा सौद्यामध्ये दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होत आहे. या ठिकाणी होणाऱ्या सौद्यात देशभरातील व्यापारी सहभागी होत आहेत. यामुळे या व्यापाऱ्यांकडील अडते, शेतकऱ्यांचे सर्व पैसे येण्यासाठी दि. ३० ऑक्टोबर ते दि. २५ नोव्हेंबर या कालावधीत बेदाणा सौदे बंद ठेवले होते. शनिवारी महिना संपत असतानाही अजून शंभर टक्के शून्य पेमेंट झाले नसल्यामुळे सांगली बेदाणा सौदे बंद ठेवले होते.सांगली, तासगाव बेदाणा असोसिएशनने सर्व व्यापाऱ्यांना मंगळवारपर्यंत १०० टक्के पैसे आडत व शेतकऱ्यांचे दिले आहेत, असे पत्र देण्यासाठी मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये पैसे न दिल्यास बुधवारी (दि. २९) होणाऱ्या बेदाणा सौद्यात व्यापाऱ्यांना सहभागी होऊ देणार नाही, असे सर्व व्यापाऱ्यांना असोसिएशनने कळविले आहे. बाजार समितीचे सचिव चव्हाण यांनीही ज्या व्यापाऱ्यांनी पैसे थकीत ठेवले आहे, त्यांना बेदाणा सौद्यात सहभागी होता येणार नाही, असा इशारा दिला आहे.

बहुतांशी बेदाणा व्यापाऱ्यांनी आडते, शेतकऱ्यांचे थकीत सर्व पैसे दिले आहेत. केवळ दोन ते तीन व्यापाऱ्यांकडे पैसे थकीत असून, त्यांना देण्याची सूचना दिली आहे. जोपर्यंत ते थकीत पैसे देणार नाहीत, तोपर्यंत त्यांना सौद्यात सहभागी होता येणार नाही. - राजेंद्र कुंभार, अध्यक्ष, सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशन. 

सर्व बेदाणा व्यापाऱ्यांना आडते, शेतकऱ्यांचे देणे-घेणे नसल्याचे पत्र देण्याची सूचना दिली आहे. ज्या व्यापाऱ्यांकडून देणे-घेणे नसल्याचे पत्र मिळेल, त्यांनाच बेदाणा सौद्यात सहभागी होता येणार नाही. थकबाकीदारांना सौद्यात सहभागी होता येणार नाही. -महेश चव्हाण, सचिव, सांगली बाजार समिती

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजार