शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : वायफळेतील खून प्रकरणास जातीय रंग नको : दिलीप कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 17:53 IST

वायफळे (ता. तासगाव) येथील मातंग समाजातील राजेश फाळके यांच्या खून प्रकरणास जातीय किंवा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. फाळके कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत दिली असून, त्यांच्या मुलास नोकरीत सामावून घेण्यासाठीही आम्ही प्रयत्न करू, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देवायफळेतील खून प्रकरणास जातीय रंग नको : दिलीप कांबळेकुटुंबियांना आर्थिक मदतीबरोबरच नोकरीसाठीही प्रयत्न

सांगली : वायफळे (ता. तासगाव) येथील मातंग समाजातील राजेश फाळके यांच्या खून प्रकरणास जातीय किंवा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. फाळके कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत दिली असून, त्यांच्या मुलास नोकरीत सामावून घेण्यासाठीही आम्ही प्रयत्न करू, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, वास्तविक वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या कारणावरून फाळके यांचा खून झाला आहे. राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या राजेश पाटील याला पोलिसांनी अटक करून कोठडी घेतली आहे. वायफळेत कधीही जातीय तणावाच्या घटना घडलेल्या नाहीत.

आता जाती-जातीत तणावाची परिस्थिती कुठेही नाही. सामाजिक सलोखा राखला जावा, यापुढे गावात अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून आम्ही व ग्रामस्थसुद्धा प्रयत्नशील राहतील. यात कोणत्याही प्रकारचे राजकारण आणण्याचा कोणीही प्रयत्न करू नये.सोमवारी फाळके कुटुंबियांची आम्ही भेट घेतली. त्यांना शासनाच्यावतीने तातडीची मदत म्हणून ४ लाख १२ हजार ५०० रुपयांचा धनादेश दिला आहे. फाळके सरकारी नोकरीत होते. त्यामुळे त्यांच्याजागी पॅरामेडिकलचे शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या मुलास आरोग्य विभागात नोकरी देण्याचा प्रयत्न आहे.दहा हजार प्रकरणे प्रलंबितओबीसी जात पडताळणीची राज्यभरात ९ ते १० हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. यात नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. सहा महिन्याच्या आत पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेकांच्या पदावर गदा येत असल्याने, आता शासन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वर्षभराची मुदत देण्याबाबत निर्णय घेण्याच्या विचारात आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल, असे कांबळे म्हणाले.ढोबळेंच्या मागे कुणी आहे का?माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या शासनावरील टीकेबाबत कांबळे म्हणाले की, त्यांच्यामागे एक तरी व्यक्ती आहे का? कोणतेही काम त्यांना आता नसल्याने, ते केवळ इशाराच देऊ शकतात.मराठा आरक्षणाचा निर्णय होणारच!कांबळे म्हणाले की, राज्यातील अडीचशेवर मराठा समाजातील नेते, संस्थाचालकांनी स्वत:पुरती संपत्ती जमा केली आणि उर्वरित मराठा समाज गरीबच राहिला. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आघाडीच्या काळात घाईगडबडीने आरक्षणाचा निर्णय घेतला गेला, तसा आम्ही घेणार नाही.

कायद्याच्या चौकटीत सक्षमपणे बसेल आणि न्यायालयात टिकेल असाच निर्णय आमचे सरकार घेईल. पंजाबराव देशमुखांनीमराठा समाजाला जातीच्या उल्लेखापुढे कुणबी, असा उल्लेख करण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील  काही ठिकाणी तसा उल्लेख केला गेला. आता सर्व समाजाचा प्रश्न सुटेल.

टॅग्स :Dilip Kambleदिलीप कांबळेSangliसांगली