शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
2
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
3
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
4
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
5
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
6
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
7
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
8
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
9
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
10
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
11
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
12
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
13
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
14
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
15
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
16
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
17
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
18
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
19
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
20
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन

अतिवृष्टीमुळे १८ हजार हेक्टरवरील पिके कुजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 11:16 IST

गेल्या दोन ते तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीचा खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, परतीच्या पावसाने हाता-तोंडाला आलेली सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके कुजली आहेत. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका खरीप ज्वारीला बसला असून, १३ हजार हेक्टर क्षेत्रातील खरीप ज्वारी पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे १८ हजार हेक्टरवरील पिके कुजलीभाजीपालाही परतीच्या पावसाने नष्ट

विटा : गेल्या दोन ते तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीचा खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, परतीच्या पावसाने हाता-तोंडाला आलेली सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके कुजली आहेत. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका खरीप ज्वारीला बसला असून, १३ हजार हेक्टर क्षेत्रातील खरीप ज्वारी पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या अखेरीस खरीप पेरण्या पूर्ण केल्या होत्या. परंतु, आॅगस्ट महिन्यापासून पावसाने हाहाकार उडविला. या महिन्यात पोषक ठरलेला पाऊस नंतरच्या दोन महिन्यात मात्र बंद झाला नाही. त्यामुळे खरीप ज्वारी, सोयाबीन, द्राक्षबागा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यातील १४ हजार ४५१ शेतकऱ्यांची १२ हजार ९८३ हेक्टर क्षेत्रातील खरीप ज्वारी कुजून गेली आहे. पाऊस बंद झाला नसल्याने ज्वारीची कणसे उगवून ज्वारी काळी पडली आहे, तर सुमारे ३ हजार ७९ हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील १ हजार ६४२ बाधित शेतकऱ्यांच्या १ हजार १८० हेक्टर क्षेत्रातील भाजीपालाही परतीच्या पावसाने नष्ट झाला आहे. तसेच १ हजार ७९८ शेतकऱ्यांच्या ९८४ हेक्टर क्षेत्रातील फळपिकेही पावसाने वाया गेली आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीfloodपूरSangliसांगली