शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मावा उधार मागण्यावरुन दोन गुंडांवर खुनीहल्ला : सांगलीत भरदिवसा थरारनाट्य; पोलिसांमुळे बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 23:10 IST

मावा उधार मागण्यावरुन झालेल्या वादातून दोघांवर खुनीहल्ला करण्यात आला. माधवनगर रस्त्यावरील बायपास रस्त्यावर गुरुवारी भरदिवसा पंधरा मिनिटे हल्ल्याचे थरारनाट्य सुरू होते. हा थरार

ठळक मुद्देहल्लेखोर ताब्यात

सांगली : मावा उधार मागण्यावरुन झालेल्या वादातून दोघांवर खुनीहल्ला करण्यात आला. माधवनगर रस्त्यावरील बायपास रस्त्यावर गुरुवारी भरदिवसा पंधरा मिनिटे हल्ल्याचे थरारनाट्य सुरू होते. हा थरार पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. पण कोणीही पुढे मदतीसाठी गेले नाही. निर्भया पथकातील पोलीस शिपाई भालचंद्र चव्हाण यांनी धाव घेतल्याने दोघेजण बचावले.

तुकाराम सुभाष मोटे (वय २४) व रोहित जगन्नाथ आवळे (२४, दोघे रा. संजयनगर, सांगली) अशी जखमी गुंडांची नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पान दुकानदार सुशांत शिवाजी सरगर (२५, छत्रपती कॉलनी, तात्यासाहेब मळा) व त्याचा आतेभाऊ विज्ञान श्रीकांत आलदर (२८, चिंतामणीनगर, माधवनगर रस्ता, सांगली) या दोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरा खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्याचे वृत्त समजताच शहर पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व गुंडाविरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळावरुन चाकू, लोखंडी गज व कोयता जप्त करण्यात आला आहे.

सुशांत सरगर याने तीन महिन्यांपूर्वी बायपास रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर ‘देवा’ पान शॉप हे दुकान सुरू केले आहे. गुरुवारी दुपारी त्याला भेटण्यासाठी आतेभाऊ विज्ञान आलदर आला होता. दोघेही पान दुकानात बोलत बसले होते. त्यावेळी तुकाराम मोटे व रोहिते आवळे आले. त्यांनी मावा मागितला.

सरगरने ‘मावा उधार मिळणार नाही’, असे सांगितले. यावर मोटेने ‘आम्ही उधार कुठे मागत आहे, फुकट मागत आहे’, असे म्हटले. यातून त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यानंतर मोटेने ‘समोर फळे विकणाऱ्या कुम्याकडून पैसे घे, आणि मावा दे, असे सांगितले. सरगरने ‘कुम्याने सांगितले तरच मावा देतो’, असे सांगितले. त्याचे हे बोलणे ऐकून मोटेला राग आला. त्याने सरगरच्या कानशिलात लगावली. हा प्रकार पाहून आलदर याने दुकानातील लोखंडी गज घेऊन मोटेच्या डोक्यात हल्ला केला. सरगर व विज्ञानने त्याठिकाणच्या शहाळे विक्रेत्याकडील कोयता व चाकू आणून मोटे व आवळेवर हल्ला केला.

पोलिसांमुळे दोघे बचावलेजिल्हा पोलीस दलाच्या निर्भया पथकातील पोलीस हवालदार भालचंद्र चव्हाण हे या मार्गावरुन निघाले होते. गर्दी पाहून ते थांबले. धारदार हत्याराने हल्ला सुरू असल्याचे लक्षात येताच ते मारामारी सोडविण्यास पुढे गेले. हल्ला करणाºया सुशांत सरगर व विज्ञान आलदर या दोघांना रोखून धरले. पण गर्दीतील एकही व्यक्ती त्यांच्या मदतीसाठी गेली नाही. चव्हाण यांनी गर्दीतील लोकांना पोलीस ठाण्यात फोन करण्याची सूचना केली. मात्र एकानेही फोन केला नाही. शेवटी त्यांनीच फोन केला. त्यानंतर शहर पोलीस दाखल झाले. चव्हाण थांबल्यामुळे मोटे व आवळे बचावले.सांगलीत गुरुवारी दुपारी माधवनगर रस्त्यावर बायपास रस्त्यावर दोन गुंडांवर खुनीहल्ला झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी