लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कासेगाव व कुरळप येथील प्राथमिक शाळांना भेट देऊन ‘मॉडेल स्कूल’साठी या शाळांमध्ये काय सोयी-सुविधा उभारता येतील, याची पाहणी युवा नेते प्रतीक पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली. यावेळी त्यांनी शिक्षकांसोबतही चर्चा केली.
पालकमंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा सर्वांगिण दर्जा वाढविण्यासाठी जिल्ह्यात १४१, तर तालुक्यातील २४ प्राथमिक शाळांमध्ये ‘मॉडेल स्कूल’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील, संगीता पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे या दौऱ्यात सहभागी झाले होते.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘मॉडेल स्कूल’ उपक्रमासाठी जिल्ह्यातील १४१, तर वाळवा तालुक्यातील २४ शाळांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आली आहे. या शाळांमध्ये ग्रंथालय, प्रयोगशाळा, चांगले मैदान, संरक्षक भिंत, स्वयंपाक घर, जेवायला बसायची व्यवस्था, परसबाग आदी सुविधा उभारत या शाळांचा सर्वांगिण दर्जा वाढविण्याचा प्रयत्न आहे. सध्या या शाळांमध्ये काय सोया-सुविधा आहेत आणि आणखी काय सुविधा उभाराव्या लागतील, याची पाहणी करण्यात आली.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, बांधकाम उपअभियंता संदीप पाटील, पाणी पुरवठा उपअभियंता राजेंद्र माळी, कासेगावचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच दाजी गावडे, ग्रामसेवक राहुल सातपुते, कुरळपच्या सरपंच शोभा पाटील, माजी पंचायत समिती सदस्य बाबुराव वायदंडे, वारणा दूध संघाचे संचालक व्ही. टी. पाटील, पंडित पाटील, ग्रामसेवक लालासाहेब पाटील उपस्थित होते.
फोटो : १० इस्लामपूर १
ओळी : कासेगाव (ता. वाळवा) येथील प्राथमिक शाळा क्रमांक १ ची पाहणी प्रतीक पाटील, जितेंद्र डुडी यांनी केली. यावेळी देवराज पाटील, शशिकांत शिंदे, किरण पाटील उपस्थित होते.