शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

दुबईस्थित कंपनी आठशे कोटी गुंतविण्यास तयार

By admin | Updated: July 16, 2016 00:03 IST

महापौरांना पत्र : वाद होण्याची शक्यता

सांगली : महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी परदेशी बँका, कंपन्यांकडून कर्ज घेण्याची तयारी चालविली आहे. मध्यंतरी दुबईस्थिती पेट्रोकॉर्प कंपनीने पालिकेशी संपर्क साधला होता. आता या कंपनीकडून ८०८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. तसे पत्रच कंपनीच्या प्रतिनिधींनी महापौर हारूण शिकलगार यांना दिले. या गुंतवणुकीवरून पालिकेत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पेट्रोकॉर्प या दुबईच्या पेट्रोलियम कंपनीने महापालिकेच्या पाणीपुरवठा व ड्रेनेज व्यवस्थेसाठी कर्ज देण्याची तयारी दर्शविली होती. या कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रात्याक्षिकही दाखविले होते. त्यानंतर त्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी कंपनीचे प्रतिनिधी राजदील जमादार यांनी महापौर शिकलगार व आयुक्त रवींद्र खेबूडकर यांची भेट घेऊन ८०८ कोटी रुपये गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात अत्याधुनिक अल्ट्राफिल्ट्रेशन दर्जाची शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात येईल. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ३८० कोटी व दुसऱ्या टप्प्यात ४२८ कोटी असा ८०८ कोटीचा रुपये खर्च होईल. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान देऊ. या प्रकल्पामुळे भांडवली खर्चात वार्षिक ८ ते १० कोटीची बचत होणार आहे. सध्याच्या आपल्या प्रचलित दरानुसार पाणीपट्टी वसू करावी, त्यानंतर प्रत्येक वर्षी दहा टक्के नाममात्र दरवाढ करावी, असा करार २० वर्षासाठी करावा अशी अपेक्षा आहे. सध्याच्या जलशुध्दीकरण खर्चातील विद्युत शुल्क वार्षिक किमान ६ कोटी व रॉ वॉटर खरेदीचे किमान ४ कोटी असे दहा कोटी प्रत्येक वर्षी बचत होईल, शिवाय केमिकल खरेदी व देखभाल दुरुस्तीवरील खर्चही वाचणार आहे.महापालिकेच्यावतीने तीनही शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी किमान ३०० कोटीचा जलपुरवठा वाहिनी व शंभर टक्के मिटरिंग करावा लागेल. (प्रतिनिधी) ४९० कोटीचे काम...या प्रकल्पात वारणा पाणी उपसा योजना ७० कोटीचा खर्चही कंपनीकडून करण्यात येईल. पाणीपुरवठ्यासोबतच सांडपाणी, मलनि:सारणाचे उर्वरित १२० कोटीचे असे एकूण ४९० कोटीचे काम करावे लागणार आहे. या तिन्ही कामाचा सविस्तर अभ्यास करुन सविस्तर अहवाल लवकरच सादर केला जाईल, असेही पत्रात म्हटले आहे.