फोटो : २७०५२०२१-आयएसएलएम-वाळवा विलगीकरण न्यूज : वाळवा येथील विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करताना दिलीपतात्या पाटील. समवेत बाळासाहेब पाटील, विजयबापू पाटील, नेताजीराव पाटील, संग्राम पाटील, डॉ. वैभव नायकवडी.
वाळवा : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला.
या विलगीकरण कक्षात महिला व पुरुष अशा पंधरा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. राजारामबापू साखर कारखान्याच्या वतीने या कक्षासाठी ऑक्सिजन मशीन दिल्या आहेत.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, पंचायत समितीचे उपसभापती नेताजीराव पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नायकवडी, डॉ. संताजी थोरात, जालिंदर थोरात, बजरंग थोरात, जयकर गावडे, शेखर शेळके, नंदकुमार शेळके उपस्थित होते.