शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औषधे कुचकामी; द्राक्षबागा रोगांनी निकामी : प्रभावहीन औषधांतून लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 21:38 IST

हजारो रुपये खर्च करूनही बोगस औषधे कुचकामी ठरत असल्याने द्राक्ष बागायतदारांना फटका बसला आहे. काही बोगस औषध कंपन्यांनी पाळेमुळे रोवल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे बागायतदारांना फटका

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रित करून बोगस औषधांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. खराब हवामानामुळे द्राक्षबागांत रोगांनी थैमान घातले आहे. पण बागेतील रोग आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या औषध फवारणींचा प्रभावच जाणवत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हजारो रुपये खर्च करूनही बोगस औषधे कुचकामी ठरत असल्याने द्राक्ष बागायतदारांना फटका बसला आहे. काही बोगस औषध कंपन्यांनी पाळेमुळे रोवल्याचे चित्र आहे.

तासगाव तालुक्यात द्राक्षक्षेत्र मोठे आहे. एक एकर द्राक्षबागेसाठी सुमारे एक लाख रूपये केवळ औषधांवर खर्च होतात. वाढत्या महागाईत औषधांचेही दर वाढले आहेत. द्राक्षबागांसाठी आंतरराष्टÑीय औषध कंपन्यांपासून अगदी लोकल कंपन्यांपर्यंत औषधांची निर्मिती करून विक्री केली जाते.

यंदा द्राक्ष हंगामात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोगांचा सामना करावा लागत आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांना रोगांनी घेरले आहे. द्राक्षबागा जतन करण्यासाठी शेतकºयांकडून मोठ्या जिद्दीने औषध फवारणीसाठी धडपड सुरु असते. कोणताही विचार न करता, अनेक महागडी आणि बाजारात उपलब्ध असणारी औषधे फवारणी करून बागा जतन करण्यासाठी धडपड सुरु आहे. पण बागा वाचवण्यासाठी फवारणी केलेल्या औषधांना गुणवत्ताच नसल्याने, हजारो रुपये खर्ची करूनही काही औषधांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव अनेक द्राक्ष बागायतदारांना आला आहे. त्यामुळे हजारो रुपये खर्च करूनही द्राक्षबागांना रोगांचा फटका बसतच आहे.

तासगाव तालुक्यात अनेक बोगस औषधांची राजरोसपणे विक्री सुरु आहे. काही बनावट कंपन्यांमार्फतही औषधे शेतकºयांच्या माथी मारली जात आहेत. बोगस औषधांप्रमाणेच बोगस औषध कंपन्यांचाही सुळसुळाट झाला आहे. केवळ लेबल लावून कंपनी प्रॉडक्ट असल्याचे भासवून अनेक बोगस औषधे शेतकºयांच्या माथी मारली जात आहेत.

औषधांची बोगसगिरी राजरोसपणे सुरु असताना, कृषी विभागाकडून मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. औषधांची गुणवत्ता आणि त्यांची पडताळणी न करताच औषधे खपवली जात आहेत. एकीकडे औषधासाठी खर्च आणि दुसरीकडे त्यांचा प्रभावच नसल्याने बागेचे होणारे नुकसान, अशा दुहेरी कात्रीत द्राक्ष बागायतदार सापडला असून, कृषी विभागाच्या अधिकाºयांनी याची सखोल चौकशी करून बोगस औषधांवर बंदी आणावी, अशी मागणी होत आहे. 

तासगाव तालुक्यात बोगस औषधांची विक्री करून द्राक्ष उत्पादक शेतकºयांची राजरोस लूट सुरु आहे. मात्र याबाबत तालुका कृषी विभाग गांभीर्यहीन आहे. तालुक्यात औषध विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र ऐन द्राक्ष हंगामात गुणवत्तेची पडताळणी करणारे अधिकारी तालुक्यात दिसून येत नाहीत. औषध दुकानांची तपासणी करण्याचे गरज आहे. कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून केवळ कागदी घोडे नाचवून कारभार सुरु आहे.-संतोष आठवले, सदस्य, पंचायत समिती तासगाव.

 

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी