शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

दुष्काळी परिस्थिती; सांगली जिल्ह्यात एक कोटीचे चारा बियाणे वाटप होणार 

By अशोक डोंबाळे | Updated: March 6, 2024 15:42 IST

चाऱ्यासाठी शंभर टक्के अनुदान:  पाच दुष्काळी तालुक्यात चारा टंचाई 

सांगली : जिल्ह्यातील दूभत्या जनावरांसाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून चारा बियाणे वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील एक कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर बियाणे वाटप होणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.जिल्ह्यात शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय केला जातो. दुधाचे अर्थकारण मोठे आहे. जिल्ह्यात १४ लाख ३ हजार ६३३ जनावरांची नोंद आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस चारा टंचाईची भीषणता वाढू लागली आहे.  दरवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चारा बियाणेसाठी २५ लाखाच्या निधीची तरतूद केली जाते. तालुक्यातून किती शेतकरी चारा बियाण्यांची मागणी केली जाते, त्यानुसार बियाणे दिले जाते.परंतू यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वच तालुक्यात चारा टंचाई भासणार असल्याने चारा बियाणांच्या निधीत ७५ लाखांनी वाढ केली आहे. अर्थात यंदा बियाणांसाठी एक कोटी निधीची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात ३० लाख रुपयांचे बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले होते.

दुसऱ्या टप्प्यात ७० लाखदुसऱ्या टप्प्यात ७० लाख रुपयांची तरतूदीतून बियाणे शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन केले. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील संबंधित विभागाला अर्ज मागवण्यासाठी उद्दिष्ट दिले होते. तसेच संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांची चारा बियाणे मागणी अर्ज घेतले. प्रत्येक तालुक्यातून चारा बियाणांसाठी मागणी आली आहे.शेतकऱ्यांनी चारा बियाणे मागणी केल्यानुसार याची तालुकानिहाय याद्या वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केली. त्यानंतर ड्रॉपध्दतीने शेतकऱ्यांनी निवड करुन  शेतकऱ्यांना चारा बियाणे वाटप करण्याचे नियोजन केले. त्यानुसार प्रत्येक लाभार्थीला सात किलोचे पॅकींगमध्ये १४०० रुपयांचे  मका बियाणे वाटप केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळ