शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत दोन अवजड ट्रकच्या अपघातात चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 18:31 IST

मिरज : मिरज- सांगली रस्त्यावर कृपामयीसमोर शुक्रवारी सकाळी मालवाहू ट्रेलरची दुसºया ट्रेलरला धडक बसल्याने ट्रेलर रस्ता दुभाजकावर उलटला. या ...

मिरज : मिरज-सांगली रस्त्यावर कृपामयीसमोर शुक्रवारी सकाळी मालवाहू ट्रेलरची दुसºया ट्रेलरला धडक बसल्याने ट्रेलर रस्ता दुभाजकावर उलटला. या अपघातात ट्रेलर चालक गुलाबसिंग मंगलसिंग (वय ३२, रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) हा जखमी झाला. अपघातामुळे  सांगली-मिरज रस्त्यावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

शुक्रवारी सकाळी गुलाबसिंग मंगलसिंग हा मोठ्या लोखंडी पट्ट्यांचे रोल असलेला १६ चाकी ट्रेलर (क्र. पीबी ०२ एव्ही ८६८९) घेऊन मिरजेकडे येत होता. या ट्रेलरमागे असलेला दुसरा ट्रेलर (क्र. पीबी ११ बीयू ४६६९) घेऊन चंद्रभाग श्रीराम सिंग (३३, रा. कळंबोली, मुंबई) हे जात होते. ही दोन्ही वाहने कृपामयीजवळ आली असता, तेथील गतिरोधकावर गुलाबसिंग यांचा ताबा सुटून त्यांचा ट्रेलर रस्ता दुभाजकावर उलटला. याचवेळी मागून येणाºया ट्रेलरची त्यास धडक बसली. दोन अवजड वाहनांच्या जोरदार अपघातात,

दोन्ही वाहने एकमेकांच्या विरूध्द दिशेला जाऊन पडली. त्यामुळे प्रथमदर्शनी हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत तर्क-वितर्क सुरू होते. जखमी ट्रेलरचालक गुलाबसिंग यांना मिरज शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात