शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त पदाचे स्वप्न अखेर पूर्ण -: नितीन कापडणीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:05 IST

सांगलीतूनच प्रशासकीय सेवेची एबीसीडी शिकलो आहे. हे शहर माझ्यासाठी नवीन नाही. चार वर्षे उपायुक्त म्हणून या शहरात काम केले. याच शहरात आयुक्त म्हणून येण्याचे स्वप्न होते. आज हे स्वप्न पूर्ण झाले असे सांगताना,

ठळक मुद्देसांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचा पदभार स्वीकारला

सांगली : सांगलीतूनच प्रशासकीय सेवेची एबीसीडी शिकलो आहे. हे शहर माझ्यासाठी नवीन नाही. चार वर्षे उपायुक्त म्हणून या शहरात काम केले. याच शहरात आयुक्त म्हणून येण्याचे स्वप्न होते. आज हे स्वप्न पूर्ण झाले असे सांगताना, जनतेला मूलभूत सुविधा देण्याचा व शासकीय योजना मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही महापालिकेचे नूतन आयुक्त नितीन कापडणीस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

कापडणीस यांची महापालिकेच्या आयुक्तपदी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. बुधवारी त्यांनी पदभार स्वीकारला. कापडणीस म्हणाले की, प्रशासकीय सेवेची सुरूवातच सांगली महापालिकेतून झाली होती. त्याच महापालिकेत आयुक्त म्हणून काम करण्याचे स्वप्न पाहिले होते. महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी सारेच परिचित असल्याने, पहिल्या सेकंदापासून कामाला सुरूवात करण्यात कसलीच अडचण नाही. जनतेला मूलभूत सुविधा देण्यास माझे प्राधान्य राहील. त्याशिवाय शासकीय योजना पूर्ण करण्यावर भर राहील. शासनाच्या योजना अपूर्ण राहिल्या, तर पुढील निधी मिळण्यात अडचण येते. त्यामुळे योजनांवरील निधी वेळेवर खर्च करून जादा निधी आणण्यासाठी पाठपुरावा करू.

तीनही शहरातील अतिक्रमणांच्या प्रश्नाची माहिती आहे. शहरातील प्रमुख रस्ते मोकळे राहिले पाहिजेत. त्यासाठी नियोजन करू. फेरीवाला धोरणही रखडले आहे. त्याचीही अंमलबजावणी करणार आहोत. अनधिकृत बांधकामांना चाप लावला जाईल. त्यासाठी बांधकाम नियमावली आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तीन शहरांची मिळून महापालिका झाली आहे. त्यामुळे आयुक्त म्हणून केवळ सांगलीच्या कार्यालयातच कामकाज करणार नाही, तर मिरज व कुपवाड शहरालाही आठवड्यातून एक दिवस राखीव ठेवणार आहोत. त्यामुळे या दोन्ही शहरांतील समस्याही सुटण्यास मदत होईल. हे शहर चांगले करण्याचा प्रयत्न आहे. ज्या शहराने प्रशासकीय सेवेची एबीसीडी शिकविली, तिथे चांगले काम करू, असेही कापडणीस म्हणाले.उत्पन्नाचे स्रोत : वाढविण्यावर भरकापडणीस म्हणाले, जनतेला मूलभूत सुविधा देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम हवी. महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर आपला भर राहील. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन करणार आहोत. त्यात अधिकारी, कर्मचारी निश्चितच सहकार्य करतील. त्यांना सोबत घेऊन जनतेला अपेक्षित असलेले कामकाज करता येऊ शकते. त्यामुळे प्राधान्याने आम्ही स्रोत बळकटीकरणावर भर देणार आहोत. . 

टॅग्स :commissionerआयुक्तSangliसांगली