शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

शिक्षकांच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढू : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:16 IST

इस्लामपूर (जि. सांगली ) : राज्यातील शासकीय शाळांना सरकार पायाभूत सुविधा देत आहेत. येत्या राज्याच्या अंदाजपत्रकात शिक्षक परिषदेच्या काही ...

इस्लामपूर (जि.सांगली) : राज्यातील शासकीय शाळांना सरकार पायाभूत सुविधा देत आहेत. येत्या राज्याच्या अंदाजपत्रकात शिक्षक परिषदेच्या काही मागण्यांना निधी उपलब्ध करून दिला जाईल. अधिवेशनानंतर मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व अर्थमंत्र्यांसमवेत व्यापक बैठक घेऊन शिक्षकांच्या प्रश्नांवर योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.इस्लामपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि विविध संघटनांच्यावतीने ‘मातृभाषिक नि:शुल्क शिक्षण वाचवा’ ही राज्यव्यापी जनपरिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. या जनपरिषदेत ११ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.चंद्रकांत पाटील म्हणाले, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांची शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीची धडपड कौतुकास्पद आहे.आघाडी सरकारच्या काळात आम्ही दोघांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. यापुढील काळातही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आम्ही कार्यरत राहू.या जनपरिषदेचे मुख्य संयोजक भगवानराव साळुंखे म्हणाले, मातृभाषिक नि:शुल्क शिक्षण प्रणाली सक्षम झाली पाहिजे, यासाठी ही जनपरिषद घेत आहोत. शैक्षणिक संस्था व शाळांना मंजुरी देण्याचे यापूर्वीचे सर्व निकष डावलून आता राज्यात शाळांचा चातुर्वण्य निर्माण झाला आहे. शिक्षण क्षेत्रात व्यापार करून नफा कमावणारी वृत्ती शिरली असून, त्याला शासनाचे धोरण कारणीभूत आहे. मराठी माध्यमाच्या शाळा वाचविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांची पाठ...!या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पाठ फिरवल्यामुळे शिक्षकांची घोर निराशा झाली. सकाळची बोचरी थंडी आणि त्यानंतरच्या भर उन्हात शिक्षक बसले होते. या परिषदेलाही शिक्षकांची उपस्थिती जेमतेमच राहिली.