शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

नाट्यपंढरीतील नाट्यसंस्थांना राजमान्यता नाहीच; शासनाच्या यादीत सांगलीतील एकही संस्था नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 20:09 IST

मिरजेतील अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या परीक्षाही अतिरिक्त गुणांसाठी पात्र ठरल्या. तीन वर्षांपर्यंत या संस्था पात्र होत्या. नवी यादी १० डिसेंबरला जाहीर झाली. त्यातील संस्थांना मार्च २०२० पासूनच्या परीक्षेत अतिरिक्त गुणांचे अधिकार आहेत, मात्र यात सांगलीची एकही संस्था नाही.

ठळक मुद्देदहावीत अतिरिक्त गुणांच्या अधिकारापासून वंचित

संतोष भिसे

सांगली : शास्त्रीय गायन, वादन, नृत्य तसेच लोककलेत पारंगत विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुणांचा लाभ मिळतो. ते देण्यासाठी राज्यभरातील ६७ अधिकृत संस्थांची यादी सांस्कृतिक संचालनालयाने नुकतीच जाहीर केली. मात्र नाट्यपंढरी म्हणवणाऱ्या सांगलीतील एकही संस्था यादीत नाही. सांगलीच्या कलाक्षेत्राची वाढ खुंटली की काय, अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शासनाच्या यादीत गायन, वादन व नृत्याच्या परीक्षा घेणाऱ्या पन्नास, तर लोककलेसाठीच्या सतरा संस्थांचा समावेश आहे. खेळाडूंना दहावीत अतिरिक्त गुणांची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे, कलाक्षेत्रासाठी मात्र नव्हती. राज्यातील कलासंस्थांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर २०१७ मध्ये कला क्षेत्रासाठीही गुणांचा निर्णय झाला. मिरजेतील अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या परीक्षाही अतिरिक्त गुणांसाठी पात्र ठरल्या. तीन वर्षांपर्यंत या संस्था पात्र होत्या. नवी यादी १० डिसेंबरला जाहीर झाली. त्यातील संस्थांना मार्च २०२० पासूनच्या परीक्षेत अतिरिक्त गुणांचे अधिकार आहेत, मात्र यात सांगलीची एकही संस्था नाही.सांगलीत अनेक विद्यार्थी नाट्यक्षेत्रात काम करतात. कलेच्या एका टप्प्यावर प्रवाहातून बाहेर पडतात, त्यानंतर चरितार्थासाठी नाटकातील योगदानाचा काहीही फायदा होत नाही. सांगली-मिरजेत काही संस्था नृत्य, गायन, वादनाचे वर्ग घेतात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांना बसवतात. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांचा फायदा मिळतो. नाटकासाठी मात्र अशी संस्था सांगलीत नाही. परीक्षा घेणारी पायाभूत संस्था उभी करण्यापेक्षा गुरुकुल पद्धतीनुसार कला शिक्षणावरच येथील संस्थांचा भर आहे.-------ह्यसांगलीत २२ हून अधिक नाट्यसंस्था असताना एकही संस्था यादीत असू नये, हे आश्चर्यजनक आहे. जिल्'ात नाट्य परिषदेच्या शाखाही सशक्तपणे काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून शासनदरबारी पाठपुरावा व्हायला हवाह्ण.डॉ. दयानंद नाईक, ज्येष्ठ रंगकर्मी---असे मिळतात गुणशास्त्रीय गायन, वादन व नृत्याच्या तीन परीक्षा उत्तीर्ण झाल्यास दहावीत पाच अतिरिक्त गुण मिळतात. पाच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहा गुण मिळतात.---------चौकटमुंबई-पुण्याच्या संस्थांचाच भरणाशासनाने जाहीर केलेल्या यादीत गायन, वादन व नृत्यासाठी मुंबई-पुण्याच्या संस्थांचाच भरणा आहे. लोककलेसाठीच्या सतरा संस्थांच्या यादीत मात्र पुण्याची फक्त एक व मुंबईच्या दोन संस्था आहेत. उर्वरित चौदा राज्यभरातील आहेत. राज्यात सांस्कृतिक मंत्री नसल्याने यादीला विलंब होत होता. संस्थांनी पाठपुरावा करून ती मंजूर करून घेतली.------- 

 

 

टॅग्स :NatakनाटकSangliसांगली