शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘ड्रॅगन फ्रूट’चे सांगली जिल्ह्यात ४०० टनाचे उत्पादन : मागणी अभावी दर गडगडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 22:30 IST

ड्रॅगन फ्रूट या फळाच्या लागवडीखाली जिल्ह्यात सव्वाशे एकरहून अधिक क्षेत्र आले आहे. यंदा फळाचा दुसरा हंगाम सुरू असून ४०० टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. उत्पादन वाढल्यामुळे दर घसरला असून, तो किलोला ५० ते ११० रुपये मिळत

ठळक मुद्दे५० ते ११० रुपये किलो दराने विक्री

अशोक डोंबाळेसांगली : ड्रॅगन फ्रूट या फळाच्या लागवडीखाली जिल्ह्यात सव्वाशे एकरहून अधिक क्षेत्र आले आहे. यंदा फळाचा दुसरा हंगाम सुरू असून ४०० टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. उत्पादन वाढल्यामुळे दर घसरला असून, तो किलोला ५० ते ११० रुपये मिळत आहे.

निसर्गाचा लहरीपणा आणि सततच्या दुष्काळामुळे डाळिंब, द्राक्षबागायतदारांना नेहमीच आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. तेल्या रोगामुळे डाळिंब बागा आणि शेतकरीही उद्ध्वस्त झाला आहे. मात्र येथील येरळा प्रोजेक्ट संस्थेने ड्रॅगन फ्रूटचा पर्याय सर्वप्रथम २०१५ मध्ये जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपुढे ठेवला. पहिल्यावर्षी जिल्ह्यातील मोजक्यात शेतकºयांनी चाळीस एकरावर ड्रॅगन फ्रूटची शेती केली. या शेतकऱ्यांच्या पदरात पहिले पीक २०१७ मध्ये पडले. त्याचे उत्पन्न ७० टन होते. दुष्काळी भागातील ड्रॅगन फ्रूटची चव ग्राहकांच्या गळी उतरल्यामुळे त्यांच्याकडून मागणीही तेवढीच वाढली. दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत दर मिळाला. डाळिंब शेतीला पर्याय म्हणून ड्रॅगन फ्रूटकडे शेतकरी वळण्यास सुरुवात झाल्याचे जिल्ह्यातील वाढत्या क्षेत्रावरून दिसत आहे. जत तालुक्यातून ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीला सुरुवात झाली असली तरी, सध्या तासगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यापर्यंत त्याचा विस्तार झाला आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात यावर्षी १२५ एकरावर ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र आहे. ४०० टन उत्पादन यावर्षी मिळणार आहे. उत्पादन वाढल्यामुळे ड्रॅगन फ्रूटचे दर यावर्षी कमी झाले आहेत. सरासरी १०० ते २०० रुपये किलोला मिळणारा दर सध्या ५० ते ११० रुपयांवर आला असल्याचे शेतकºयांचे मत आहे. सांगलीच्या विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये रोज दीड ते दोन टन ड्रॅगन फ्रूटची आवक असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. आवक वाढल्यामुळे दर उतरल्याचे व्यापारी सांगत आहेत.एकदाच गुंतवणूक, नंतर अत्यल्प पाणी आणि देखभाल खर्चात हे पीक भरघोस नफा देते. पुण्या-मुंबईसह बेंगळुरूच्या बाजारपेठेत प्रतिकिलो १०० ते १५० रुपये भाव मिळतो. हा दर अगदी चाळीस रुपये किलोप्रमाणे मिळाला तरी, उसापेक्षा जादा उत्पन्न मिळत असल्याचा दावा येरळा संस्थेचे सचिव नारायण देशपांडे यांनी केला आहे.सरकारने निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यावे : जयकर साळुंखेदीड वर्षातील लागवडीबद्दलचा अनुभव नोंदवताना कमळापूर (ता. खानापूर) येथील जयकर साळुंखे म्हणाले की, ड्रॅगन फ्रूट लागवडीस एकरासाठी पहिल्या वर्षी तीन ते चार लाखांची गुंतवणूक करावी लागली. मात्र दुसºया वर्षी ६० ते ७० हजार रुपये मनुष्यबळास खर्च आला. औषधे, खतासाठीचा किरकोळ खर्च येतो. नर्सरीतूनही चांगला नफा मिळवला. उत्पादन वाढल्यामुळे दर उतरले आहेत. ड्रॅगन फ्रूटची शेती वाढविण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.ड्रॅगन फ्रूट शेती दुष्काळग्रस्तांसाठी उत्तम पर्याय : नारायण देशपांडेपहिल्या वर्षी ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी एकरी तीन ते चार लाख रुपयांचा खर्च येतो. त्यानंतर ४० ते ५० हजार रुपयेच उत्पादन खर्च येतो. पहिल्या वर्षी एकरी टनभर, तर दुसºयावर्षी तीन टन, तिसºया वर्षी चार ते पाच टन उत्पन्न मिळत असून दरवर्षी उत्पन्नात वाढच होते. बारा ते पंधरा वर्षे ड्रॅगन फ्रूटचे उत्पन्न मिळते. ५० ते ६० रुपये किलोला दर मिळाला तरीही ड्रॅगन फ्रूटची शेती परवडते. शेतकºयांनी स्वत:ची नर्सरी सुरु केल्यास त्यापासूनही उत्पन्न मिळविता येते, अशी प्रतिक्रिया येरळा प्रोजेक्ट सोसायटीचे सचिव नारायण देशपांडे यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीfruitsफळे