शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
3
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
4
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
5
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
6
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
7
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
8
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
9
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
10
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
11
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
12
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
13
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
14
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
15
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
16
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
17
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
18
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
19
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
20
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला

दुष्काळात डाळींच्या दरवाढीचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 7:28 PM

अशोक डोंबाळे । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मागणीत सातत्याने होत असलेली वाढ आणि दुष्काळी परिस्थितीत घटलेले उत्पादन यामुळे ...

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मागणीत सातत्याने होत असलेली वाढ आणि दुष्काळी परिस्थितीत घटलेले उत्पादन यामुळे डाळींच्या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसला आहे. दीड महिन्यातच क्विंटलमागे सरासरी दीड ते दोन हजार रुपयांची वाढ झाली असून, या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांनाच होताना दिसत आहे. तूर, मूग आणि हरभरा डाळ यांच्या दराचा आलेख ऐन दुष्काळातच वाढत चालला आहे.महागाई दिवसेंदिवस वाढत असताना, आता पुन्हा डाळींच्या दराने त्यात मोठी भर टाकली आहे. त्यामुळे किचनचे बजेट कोलमडणार असल्याचे चित्र आहे. तुरीचे पीक फेब्रुवारीच्या दुसºया आठवड्यात आले. तूरडाळ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात मुबलक प्रमाणात विक्रीस आली, तेव्हा ठोक बाजारात प्रतिकिलो ५० ते ६० रुपये भावाने विक्री झाली. दीड महिन्यातच प्रतिकिलोचे भाव ८० ते ९० रुपयांवर पोहोचले आहेत. कमी पावसामुळे यावर्षी तुरीसह सर्वच कडधान्यांचे पीक कमी येण्याचा कृषी तज्ज्ञांचा अंदाज होता. सर्व बाबी हेरून व्यापाºयांनी डाळींचे भाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तूरडाळ पुन्हा शंभर रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सांगलीसह लातूर, बीड परिसरातून येथील मार्केटमध्ये डाळींची आवक मोठ्या प्रमाणावर होत असते.तीन वर्षांपूर्वी तूरडाळीचे भाव प्रतिकिलो १७० रुपयांपर्यंत पोहोचले होते. वाढीव भावामुळे दुष्काळामध्ये सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. दोन वर्षापूर्वी तुरीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे डाळींचे दर उतरले होते.यावर्षी पुन्हा पीक कमी झाले आहे. वाढत्या मागणीमुळे भाव पुन्हा वाढले आहेत. बाजारात मुगाचे भाव वाढू लागले आहेत. सध्या मूगडाळीचा दर ७५०० ते ८००० रुपये क्विंटलवर पोहोचला आहे. किरकोळ मूगडाळीची विक्री ८० ते ८२ रुपये प्रतिकिलो दराने होत आहे. हरभºयाचे उत्पादन कमी झाल्याने त्याचेही भाव वाढत आहेत.हरभरा भाव ३८०० ते ४००० रुपये क्विंटल असा आहे. हरभरा डाळीचा दर ५७०० ते ६५०० रुपये क्विंटल असून, त्यामध्ये तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली.हरभरा डाळीची किरकोळ विक्री ५५ ते ७० रुपये किलोने होत आहे. तूरडाळ ८००० ते ९००० रुपये क्विंटल झाली असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.डाळींचे दर (प्रतिकिलो)डाळ एप्रिल २०१९ मे २०१९तूर ७० ते ७४ ८० ते ९०हरभरा ५० ते ५२ ५७ ते ६५मूग ६५ ते ७० ७५ ते ८०मटकी ७२ ते ७५ ८० ते ८५मसूर ५० ते ५२ ५४ ते ५५उडीद ५२ ते ५४ ६० ते ६५