शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बरणीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची आठवडाभर तडफड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 17:20 IST

Dog Miraj Sangli : मिरजेत शिवाजीनगरमध्ये प्लास्टीकच्या बरणीत तोंड अडकल्याने एका कुत्र्याची उपासमार सुरु होती. खाद्यपदार्थाच्या आशेने त्याने प्लास्टीकच्या बरणीत तोंड घातले आणि बरणी अडकून पडली.

ठळक मुद्देबरणीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची आठवडाभर तडफडॲनिमल राहतच्या कार्यकर्त्यांना मिळाली माहिती

मिरज : मिरजेत शिवाजीनगरमध्ये प्लास्टीकच्या बरणीत तोंड अडकल्याने एका कुत्र्याची उपासमार सुरु होती. खाद्यपदार्थाच्या आशेने त्याने प्लास्टीकच्या बरणीत तोंड घातले आणि बरणी अडकून पडली.शिवाजीनगर परिसरात आठवडाभर व्याकुळ होऊन ते फिरत होते. रहिवाशांना त्याची दया येऊनही काहीही करु शकत नव्हते. काही तरुणांनी बरणी काढण्याचा प्रयत्न केला, पण कुत्रे घाबरुन पळून गेले. अखेर ॲनिमल राहतच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळाली. कार्यकर्ते किरण नाईक, दिलीप शिंगाणा आदींनी प्रयत्न करुन कुत्र्याला पकडले.

अडकलेली बरणी काढून टाकली. तोपर्यंत तहान-भुकेने व्याकूळ झालेले कुत्रे तडफडत होते. बरणी काढली तरी निपचित पडले होते. कार्यकर्त्यांनी त्याच्यावर उपचार केले. अन्न पोटात गेल्यानंतर त्याला हुशारी आली. त्याची नसबंदी करुन सोडणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. नागरीकांनी प्लास्टीकच्या बरण्या, पिशव्या, डबे कचर्यामध्ये उघडून टाकू नयेत असे आवाहन केले. त्यांची मोडतोड करुन किंवा झाकण लाऊन विल्हेवाट लावावी असे ते म्हणाले.

 

 

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवdogकुत्राSangliसांगली