शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बिऊर येथे बिबट्याच्या शोधासाठी डॉग स्कॉड दाखल, मृत बालकाच्या वारसांना नुकसान भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:46 IST

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती

शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यूची घटना नुकतीच घडली. वनविभागामार्फत पुणे येथील रेस्क्यू टीम आणि डॉग स्कॉड दाखल झाले असून बिबट्याचा शोध सुरू केल्याची माहिती कोल्हापूर विभाग मुख्य वनरक्षक (प्रादेशिक) जी गुरुप्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी उपवनसंरक्षक सागर गवते, वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल अनिल वाजे उपस्थित होते. जी गुरुप्रसाद म्हणाले, पुणे रेस्क्यू टीम येथील स्थानिक कर्मचाऱ्यांना बिबट्याबाबत सर्व प्रशिक्षण देणार आहेत. सध्या सहा ड्रोन कॅमेरे आहेत. आता आणखी ३०-३५ ड्रोन कॅमेरे खरेदी करणार आहे. प्रत्येक गार्डकडे चार ड्रोन कॅमेरे देण्याची व्यवस्था करण्यात येईल. याचबरोबर रेस्कू टीमसाठी आवश्यक असणारे साहित्यही लवकरच पुरविण्यात येईल.बिऊर येथील मृत राजवीर हणमंत पाटील यांच्या वारसांना आज पंचवीस लाख रुपयांची नुकसान भरपाई पैकी १० लाख रुपयांचा धनादेश व पंधरा लाख रुपयांची ठेव पावती दिल्याची माहिती त्यांनी दिली. कोल्हापूर विभाग मुख्य वनरक्षक जी गुरुप्रसाद घटनास्थळी भेट देऊन या परिसराची पाहणी करून तपासासाठी सूचना दिल्या.विविध कर्मचारी कार्यरतपुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे डॉग स्कॉड प्रमुख शोमीत भिडे, शुभम सिंग, रेस्कू टीमचे निनाद ताम्हणकर, सागर शिंदे, अभिलाष बनसोडे, वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, रजनीकांत दरेकर, प्राणीमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड, रेस्क्यू टीम सदस्य शिराळाचे नामदेव सिद, संतोष कदम, कोल्हापूर रेस्क्यू टीमचे प्रदीप सुतार, अल्माटीन बांदी हे बिबट्याच्या शोधासाठी प्रयत्नशील आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Dog squad searches for leopard in Biur after child's death.

Web Summary : Following a leopard attack in Biur, a rescue team and dog squad are searching for the animal. The forest department has provided compensation of ₹10 lakh and a fixed deposit of ₹15 lakh to the victim's family. Drones will be purchased to aid in the search.