शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

पश्चिम महाराष्ट्र सूतगिरणीमुक्त करायचा आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली. तसे या सरकारला पश्चिम महाराष्ट्र सूतगिरणीमुक्त करावयाचा आहे का? असा थेट सवाल करीत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सूतगिरण्या मोडीत काढण्याचा डाव आहे, असा आरोप केला. याचवेळी त्यांनी राज्यातील सूतगिरणी व्यवसाय ...

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली. तसे या सरकारला पश्चिम महाराष्ट्र सूतगिरणीमुक्त करावयाचा आहे का? असा थेट सवाल करीत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सूतगिरण्या मोडीत काढण्याचा डाव आहे, असा आरोप केला. याचवेळी त्यांनी राज्यातील सूतगिरणी व्यवसाय कर्जमुक्त करा, अशी मागणीही केली.येथील दीनदयाळ मागासवर्गीय सूतगिरणीची २२ वी वार्षिक सभा सूतगिरणीच्या कार्यस्थळावर झाली. यावेळी डांगे यांनी मार्गदर्शन केले. सूतगिरणीचे अध्यक्ष बाळासाहेब खैरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार रामहरी रुपनवर, निती आयोगाच्या कृषी विभागाचे सदस्य रघुनाथदादा पाटील, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रघुनाथदादा पाटील, भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयकपदी निवड झालेले मकरंद देशपांडे यांच्यासह सूतगिरणीचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.अण्णासाहेब डांगे म्हणाले, भारतीय जनता पक्षामध्ये ३५ वर्षे काम केले. १५ वर्षांपूर्वी पक्ष सोडला. त्यानंतर आजअखेर एक शब्दही भाजपविषयी बोललो नव्हतो; मात्र आता अन्यायाची परिसीमा झाल्याने बोलणे भाग पडले. सूतगिरण्या बंद पडल्या, तर लाखो मजूर देशोधडीला लागतील. सरकारने वस्त्रोद्योगापुढे गांभीर्याने पाहावे. वस्त्रोद्योग मोठ्या संकटातून जात आहे. पुढच्या वर्षीची वार्षिक सभा होईल की नाही, हे सांगता येत नाही. १०० टक्के निर्यात करणाºया गिरण्यांकडून कोट्यवधीचे परकीय चलन देशाला मिळते. मात्र हा व्यवसायच बंद करण्याची मानसिकता दिसून येत आहे.ते म्हणाले, विदर्भात ४ रुपये ५० पैसे प्रति युनिट वीजदर आहे; तर पश्चिम महाराष्ट्रात हाच दर ८ रुपये प्रति युनिट इतका आहे. एक किलो सुताची निर्मिती करताना २७ रुपयांचा तोटा सोसावा लागतो. कापूस महामंडळ मोडून दलालांच्या ताब्यात कापूस खरेदी-विक्रीचे अधिकार एकवटले आहेत. त्यामुळे हे सरकार गरिबांचे, शेतकºयांचे आहे का? भांडवलदारांचे आहे? हा प्रश्न आहे. हे सरकार भांडवलदारांची पूजा करत आहे. वीजदराच्या तफावतीमुळे या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र टिकणार नाही. आम्ही जिंदाल कंपनीकडून वीज घेतली तर, सरकारने त्यावर ३ टक्के कर लावला.आमदार रामहरी रुपनवर म्हणाले, व्यवसाय तोट्यात असतानाही दीनदयाळने नफा मिळवून सभासदांचे हित जोपासले आहे. वस्त्रोद्योगाबाबत सरकारची धोरणे अत्यंत चुकीची आहेत. सूतगिरण्यांच्या वीज दराबाबत नागपूर अधिवेशनात चर्चा घडवून आणणार आहे. सूतगिरणीचे अध्यक्ष बाळासाहेब खैरे यांनी अहवाल सालात सूतगिरणीला २ कोटी ५५ लाख रुपयांचा रोकड नफा झाल्याची माहिती दिली. वस्त्रोद्योगाबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी. यावेळी रघुनाथदादा पाटील, निशिकांत भोसले-पाटील, भगवानराव साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गुणवंत कामगारांचा रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.संचालक मकरंद देशपांडे यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक अ‍ॅड. राजेंद्र डांगे यांनी नोटीस वाचन केले. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. राजकुमार पाटील यांनी आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, जि. प. सदस्य संभाजी कचरे, नगरसेवक वैभव पवार, शहाजी पाटील, माणिकराव गायकवाड, मंगल शिंगण, अशोक देसाई, एल. आर. पाटील, संचालक सुमंत महाजन, माणिक गोतपागर, प्रशांत कांबळे, मंगल पवार, एम. एन. कांबळे, अमोल चौधरी, संजय देवकुळे, अधिकारी, सभासद उपस्थित होते.हुतात्मा संकुलाचे अभिनंदनअण्णासाहेब डांगे यांनी राज्यातील सहकार क्षेत्राच्या पिछेहाटीबद्दल बोलतानाच गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३३५० रुपयांचा दर देणाºया हुतात्मा साखर कारखान्याचे अभिनंदन केले. इथेनॉल प्रकल्प उभारण्यापूर्वीच त्यांनी शासनाचे भागभांडवल परत करण्याचा विक्रम केला आहे. एकप्रकारे ही सहकारातील आर्थिक क्रांती आहे. नागनाथअण्णांचे वारसदार चांगल्या पध्दतीने काम करत आहेत, असे गौरवोद्गार डांगे यांनी काढले.