शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गाफीलपणा नको - : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:25 IST

आगामी विधानसभा तोंडावर आहे, गाफील राहू नका, असा सबुरीचा सल्ला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिला.

ठळक मुद्देइस्लामपूर मतदार संघातील कार्यकर्त्यांना सल्ला

अशोक पाटील ।इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकत्रित यावे. युवा फळीतील कार्यकर्त्यांची मोट बांधून बुथ कमिट्या सक्षम कराव्यात. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात व परिसरात संपर्क ठेवावा. गाडीच्या काचा लावून ए.सी.तून फिरण्यापेक्षा जनतेत मिसळा. आगामी विधानसभा तोंडावर आहे, गाफील राहू नका, असा सबुरीचा सल्ला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिला.

निमित्त होते, १ आॅगस्ट रोजी राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त घेण्यात येणाºया विविध कार्यक्रमांच्या नियोजनाचे. परंतु यावेळी जास्त चर्चा झाली, ती आगामी विधानसभेचीच. कारखाना कार्यस्थळावर झालेल्या या बैठकीस इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार जयंत पाटील म्हणाले, सध्या राजकारणात युवा फळीची कमतरता आहे. अशा युवकांनाच राजकारणात संधी देण्याची गरज आहे. गावा-गावातील बुथ कमिटीवर युवकांनाच स्थान द्या. गावातील सामान्यांच्या ज्या काही समस्या असतील, त्या तातडीने सोडवा. जेथे माझी गरज वाटेल, तेव्हा मला थेट कळवा. विधानसभा निवडणूक आल्यानंतरच काहीजण जनसामान्यांच्या संपर्कात जातात. तसे न करता आतापासूनच सामान्यांच्या संपर्कात राहा. त्यांच्या समस्या घरा-घरात जाऊन समजावून घ्या. ७५ हजारपेक्षा कमी मतांचे अधिक्य मिळाले, तर त्याचे काहीही सोयरसुतक नसेल. किमान १ लाखावर मतांचे अधिक्य मिळाले, तरच तो माझा विजय समजेन.

ते म्हणाले, मतदार संघातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. परंतु गावातील अंतर्गत वादामुळे दोन—दोन, तीन—तीन गट निर्माण झाले आहेत. याचा तोटा राष्ट्रवादीला होत आहे. माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपद असल्याने पूर्ण राज्याची जबाबदारी आहे. मला माझ्यासाठी जास्त वेळ देता येणार नाही. आता ही निवडणूक माझी नसून तुमचीच झाली आहे. त्यामुळे अंतर्गत वाद मिटवून सर्वजण एकदिलाने काम करा.संधी कधी? : कार्यकर्त्यांची कुजबूजया बैठकीत जयंत पाटील यांच्या अवतीभोवती असणाºया त्याच त्या चेहºयांबद्दल कार्यकर्त्यांत कुजबूज सुरु होती. राजकारणातील तिसºया व चौथ्या फळीतील युवकांना राजारामबापू उद्योग समूहात संधी देण्याबाबतही यावेळी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलElectionनिवडणूक