शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत कोथळेचा डीएनए अहवाल न्यायालयात सादर, उलट तपासादरम्यान शाब्दिक खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 12:33 IST

खुनाच्या कालावधीतील आरोपींचे मोबाइल संभाषण व सर्व तांत्रिक तपशीलही सादर

सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी तपास अधिकारी आणि तत्कालीन सीआयडीचे पोलिस उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी कोथळेचा डीएनए अहवाल सोमवारी न्यायालयासमोर सादर केला. दरम्यान, बचाव पक्षाचे वकील विकास पाटील तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्यात उलट तपासादरम्यान जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अतिरिक्त जिल्हा न्यायालयात साेमवारी खटल्याचे कामकाज झाले. निकम यांनी कुलकर्णी यांचा सरतपास नोंदवला. त्यामध्ये त्यांनी अनिकेतच्या आई-वडिलांच्या परवानगीने डीएनए चाचणीसाठी घेतलेल्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल सादर केला. खुनात सहभागी असलेल्या आरोपींनी ज्या गाडीतून अनिकेतचा मृतदेह नेला, त्या मोटारीचे कोगनोळी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज सादर केले. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून हीस्टो पॅथॉलॉजी (ऊती शास्त्र) त्याचप्रमाणे एनोटॉमी (शरीरशास्त्र) अहवालसुद्धा न्यायालयास सादर करण्यात आला.कुलकर्णी यांनी नोंदवलेल्या जबाबांची माहिती न्यायालयास दिली. खुनाच्या कालावधीतील आरोपींचे मोबाइल संभाषण व सर्व तांत्रिक तपशीलही सादर केला. अनिकेतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या आंबोली येथील घटनास्थळाचा नकाशा तसेच सांगली येथील घटनास्थळाचा नकाशा सादर केला. अनिकेत याच्या अस्थी न्यायवैद्यक परीक्षणानंतर पुढील धार्मिक विधीसाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आल्या. अनिकेतचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, त्या कारणाचा उल्लेख असलेला सविस्तर तपशीलाचा वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीAniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणCourtन्यायालय