शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग टीमने केले सर्वात उंच कळसुबाई शिखर सर, सांगलीतील ११ दिव्यांग सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 17:08 IST

Divyang Sangli- दिव्यांग टीमने राज्यातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सर करून एक आगळेवेगळे सहकार्याचे दर्शन घडवून आणले. राज्यातील ७० तर सांगली जिल्ह्यातील ११ दिव्यांग व्यक्तींनी हे शिखर सर केले.यामध्ये शिराळा येथील स्वाती भस्मे हिचा समावेश आहे.

ठळक मुद्देदिव्यांग टीमने केले राज्यातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सर शिराळा येथील स्वाती भस्मेसह सांगली जिल्ह्यातील ११ दिव्यांग व्यक्तींचा समावेश

विकास शहाशिराळा : दिव्यांग टीमने राज्यातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सर करून एक आगळेवेगळे सहकार्याचे दर्शन घडवून आणले. राज्यातील ७० तर सांगली जिल्ह्यातील ११ दिव्यांग व्यक्तींनी हे शिखर सर केले.यामध्ये शिराळा येथील स्वाती भस्मे हिचा समावेश आहे.औरंगाबाद येथील शिवुर्जा प्रतिष्ठान मार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी आपलेतील सुप्तगुणांचे दर्शन घडविण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून वेगवेगळया संधी दिली जाते. यावेळी कळसुबाई शिखर चढण्यासाठी संधी दिली. यामध्ये राज्यातील २० जिल्ह्यातील १५० पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींनी यामध्ये भाग घेतला.हे सर्व दिव्यांग कळसुबाई च्या पायथ्याशी असलेल्या जहागीरदार वाडी येथे एकत्र जमले.दुपारी दोन च्या दरम्यान शिखर चढण्यास सुरुवात केली.कडाक्याची थंडी आणि जोरदार गार वारा याची तमा न बाळगता एकमेकाला आधार देत हे सर्वजण हळूहळू शिखर चढत होते. चार तास चालत चालत १६४७ मीटर उंचीचे हे शिखर ७० दिव्यांगानी सर केले. यामध्ये सांगली जिल्ह्यातील २० जणांनी सहभाग घेतला होता त्यापैकी ११ जणांनी हे शिखर सर केले.सांगली टिम : सुदेश माने , स्वाती भस्मे , माधुरी पाटील, भगवा भंडारे , जारीना मणेर , मयुर ढेकळे , लता पाचांळ, अमर पवार, जयश्री शिंदे , अस्मिता पाटील

 

टॅग्स :Divyangदिव्यांगSangliसांगली