शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: जत तालुक्याचा त्रिभाजनाचा तिढा सुटणार कधी?, नागरिकांना त्रास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 11:51 IST

संख अपर तहसील कार्यालयात सुविधांची वानवा, उमदीचा प्रश्न अधांतरीच

विठ्ठल ऐनापुरेजत : जत तालुका हा क्षेत्रफळाने मोठा असल्याने संख व उमदी हे असे त्रिविभाजन करण्याचा तिढा सुटलेला नाही. त्यावर तोडगा काढून संख हा दुसरा तालुका जाहीर करण्याऐवजी त्या ठिकाणी केवळ अपर तहसील कार्यालय सुरू केले. मात्र, त्या ठिकाणी सुविधांची वानवा असल्याने ही तात्पुरती मलमपट्टी झाली आहे. त्यामुळे जत तालुक्यातील नागरिकांचा होणारा त्रास थांबलेला नाही. जतमधून उमदी तालुका वेगळा करण्याचा प्रश्न अधांतरीच आहे.

सांगली जिल्ह्यात जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. तालुक्यात १२३ महसुली गावे आहेत. लोकांची वेळेची व पैशाची बचत व्हावी म्हणून जत, संख व उमेदी असे तीन तालुके करण्याची मागणी आहे. हा प्रश्न गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित आहे. मधल्या काळात जतचे विभाजन करून शेगाव व उमदी तालुका करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, तोही शासन दरबारी पडून आहे. शेगाव तालुक्याचा प्रश्नही मागे पडला. मात्र, उमदी तालुका होण्यासाठी लोकांमधून पुन्हा मागणी होऊ लागली आहे.

उमदीकरांची प्रतीक्षा कायम..उमदी तालुका होण्यासाठी स्वतंत्र तालुका कृती समितीच्यावतीने २०१७ साली जिल्हाधिकारी कार्यालयावर उमदी ते जत पायी मोर्चा काढण्यात आला. मात्र, उमदी तालुका न होताच संख येथे २०१८ साली अपर तहसील कार्यालयाची घोषणा करण्यात आली. यामुळे उमदीकर नाराज झाले. अजूनही उमदी तालुका व्हावा, यासाठी उमदीकर प्रतीक्षेत आहेत.

संखला अपुरे मनुष्यबळ..संख येथे अपर तहसील कार्यालय सुरू झाले; मात्र या ठिकाणी सुविधांची वानवा आहे. मुळात पाटबंधारे खात्याच्या असलेल्या वसाहतीत अपर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले. या विभागाच्या इमारती या जुन्या झाल्या असून, गळती वाढली आहे. पावसाळ्यात या इमारतीतून पाण्याची गळती सुरू असते. त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे भिजली तर याला जबाबदार कोण? अशी अवस्था झाली आहे. या ठिकाणी पाण्याचीही सोय नाही. अपुरे मनुष्यबळ असूनही त्या कर्मचाऱ्यांना निवासाची सोय नाही.

स्टॅम्प, तिकिटासाठी जतची वारी..विलासराव जगताप हे आमदारपदी असताना संख अपर तहसीलदार कार्यालयाचे उद्घाटन २६ जानेवारी २०१८ रोजी झाले. त्या दिवसापासून तेथे कार्यालय सुरू झाले. कार्यालय सुरू झाल्यानंतर नागरिकांना स्टॅम्प व तिकिटासाठी जत येथेच जावे लागत आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून या ठिकाणी जत येथील दोघा स्टॅम्पव्हेंडरांना आलटून पालटून संख येथे जाऊन विक्री करण्याचे आदेश दिले. तरीही स्टॅम्पव्हेंडर या ठिकाणी हजर नसतात. या कार्यालयात कर्मचाऱ्यांचीदेखील वानवा आहे. नायब तहसीलदार एक, अव्वल कारकून एक, लिपिक एक पद, अशी प्रमुख पदे रिक्त आहेत. त्यामुळे आहे, त्या कर्मचाऱ्यांत संख अपर तहसील कार्यालयाचा कार्यभार सुरू आहे.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाट