शिराळा : शिराळा नगरपंचायतीच्यावतीने जागतिक दिव्यांग दिन व नो-व्हेईकल डे निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. दिव्यांग व्यक्तींना सदिच्छा, आपुलकी व विश्वासाचे प्रतीक म्हणून प्रशस्तीपत्रक व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
दिव्यांग म्हणून जीवन जगताना ते अनेक शारीरिक, मानसिक, सामाजिक अडचणींना सामोरे जाऊन धैर्याने लढत असतात. त्यांच्या लढाईत शिराळा नगरपंचायत सदैव सोबत असल्याचे प्रशासक तथा तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले.
नो-व्हेईकल डे निमित्त तिसऱ्या गुरुवारीही नागरिकांचा या अभिनव उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगरसेवक उत्तम डांगे यांनी रॅलीतील सहभागी नागरिकांना शितपेय वाटप केले. या उपक्रमात नगरसेवक संजय हिरवडे व उत्तम डांगे यांनी सहभाग नोंदविला. माजी सरपंच देवेंद्र पाटील, गजानन सोनटक्के यांनी रॅलीत सहभागी मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरसेवक उत्तम डांगे, संजय हिरवडेकर, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे स्वागत केले.
फोटो-०३शिराळा०१