शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील राजकीय अस्थिरतेने जिल्ह्यातील नेत्यांत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 11:22 IST

लहरी हवामानाने जिल्ह्याला हैराण केले असतानाच, राज्यातील लहरी राजकारणाचे ढगही आता जिल्ह्यातील राजकारण्यांच्या डोईवर दाटले आहेत. सत्तास्थापनेतील तिढा अद्याप न सुटल्याने येथील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

ठळक मुद्देराज्यातील राजकीय अस्थिरतेने जिल्ह्यातील नेत्यांत अस्वस्थतामंत्रीपदाच्या शर्यतीतही जिल्हा नेहमीच अग्रेसर

सांगली : लहरी हवामानाने जिल्ह्याला हैराण केले असतानाच, राज्यातील लहरी राजकारणाचे ढगही आता जिल्ह्यातील राजकारण्यांच्या डोईवर दाटले आहेत. सत्तास्थापनेतील तिढा अद्याप न सुटल्याने येथील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला कौल मिळाल्यानंतर युतीचे सरकार येणार म्हणून जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. दोन्ही पक्षांचे तीन आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीत आल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली होती.

अल्पावधितच राज्यातील राजकीय परिस्थिती कमालीची बिघडली. युतीतील तणाव वाढल्यानंतर जिल्ह्यातील आमदार परतले आणि येथील राजकीय घडामोडींना पूर्णविराम मिळाला. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. कोणाची सत्ता येणार, हे निश्चित नसल्याने सर्वच पक्षांतील नेत्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.राज्यातील नवे सरकार कोणाचे व कसे असणार, यावर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बदलणार आहे. माजी मंत्री आ. सुरेश खाडे, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना त्यांचे मुंबईतील दालन रिकामे करून परतावे लागत आहे. भाजप सत्तेपासून दूर होत असल्याने भाजपचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.

गत विधानसभा निवडणुकीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भाजपची यंदाच्या निवडणुकीत घसरगुंडी झाल्याने आधीच अस्वस्थ असलेल्या भाजपला आता सरकार स्थापन न होण्याची सल आहे. पक्षीय पातळीवर भाजप सध्या शांत असून, बैठका, कार्यक्रम यापासून पक्षाचे नेते, पदाधिकारी दूर आहेत.कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संभाव्य आघाडीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकीकडे सत्ता स्थापनेची स्वप्ने आणि दुसरीकडे अस्थिर राजकारणाने वाढत चाललेली धाकधूक, यातून या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना जावे लागत आहे. सरकार स्थापनेचा तिढा जिल्ह्यातील राजकीय संभ्रमावस्था वाढविणारा ठरत आहे. भाजप व शिवसेनेतील संघर्षाचा परिणाम जिल्ह्यातील अनेक संस्थांवरही होऊ शकतो. राज्यातील सरकार स्थापनेच्या घडामोडींवर जिल्ह्यातील समीकरणे बदलणार आहेत.मंत्रीपदाच्या शर्यतीतही जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक मंत्रिमंडळात जिल्ह्याची दावेदारी भक्कम ठरते. मागीलवेळी जिल्ह्याला सदाभाऊ खोत आणि सुरेश खाडे यांच्या माध्यमातून दोन मंत्रीपदे लाभली होती. त्यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याला नेहमी सर्वाधिक पदे मिळत होती. आता येथील राजकीय परिस्थिती आणि पदांसाठीच्या घडामोडी राज्यातील सत्तास्थापनेनुसार बदलणार आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली