शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही-विश्वजित कदम यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 11:57 IST

सांगली जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादामुळेच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. कृषी व सहकार अशा ग्रामीण भागाशी संबंधित खात्याचा कारभार माझ्याकडे आहे. शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करणार आहोत. विकासासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाहीराज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची ग्वाही

सांगली : जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादामुळेच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. कृषी व सहकार अशा ग्रामीण भागाशी संबंधित खात्याचा कारभार माझ्याकडे आहे. शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करणार आहोत. विकासासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.सांगलीत सर्वपक्षीयांच्यावतीने कदम यांचा नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी स्टेशन चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, चंद्रकांत कोरे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार झाला.

यावेळी आमदार विक्रम सावंत, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, शिवसेनेचे रावसाहेब घेवारे, बजरंग पाटील, शेकापचे अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, युवकचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, नगरसेवक अभिजित भोसले, वर्षा निंबाळकर, मनोज सरगर उपस्थित होते.कदम म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांच्यावर जिल्ह्यासह सांगली शहरानेही प्रेम केले. आर. आर. पाटील, मदनभाऊ व पतंगराव कदम यांच्या निधनाने जिल्ह्याला धक्का बसला. पतंगरावांच्या नंतर पलूस कडेगावची जबाबदारी माझ्यावर आली. तेथील जनतेला विश्वास देण्यासाठी अहोरात्र काम केले.

जनतेच्या पुण्याईमुळेच पहिल्यांदा बिनविरोध आमदार होण्याचे भाग्य मला मिळाले. यंदाच्या निवडणुकीनंतर सत्तेत येणार नाही, विरोधी बाकावर बसून जनतेचे प्रश्न आक्रमकपणे सोडविण्याचे मनात ठरविले होते. पण दिवाळीनंतर गणितेच बदलली आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रिपदाची संधीही मिळाली.

राजकारणात संयम ठेवावा लागतो. १९९८ पासून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर सातत्याने संघर्ष केला. पुणे लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतरही खचलो नाही. युवकचा प्रदेशाध्यक्ष म्हणून अविरत काम केले. त्यासाठी मदनभाऊंनी मोठी मदत केली.

आता ग्रामीण जनतेशी संबंधित कृषी सहकार खाते माझ्याकडे आहे. सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पहिला निर्णय झाला. सांगलीचेही काही प्रश्न आहेत. शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करू. 

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमSangliसांगली