शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

जिल्ह्याच्या जीएसटी संकलनामध्ये ८ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:47 IST

महापुराचा जबरदस्त फटका, नव्याने लागू झालेल्या कृषीमालासह विविध सेवांवरील सवलती यामुळे यंदाच्या वस्तू आणि सेवाकर (जीएसटी ) संकलनास मोठा फटका बसला आहे. एकीकडे देशभरात ६ टक्क्यांनी करसंकलन वाढले असताना, जिल्ह्यात गतवर्षाच्या तुलनेत करवसुलीत ८.४ टक्के घट दिसून येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या जीएसटी संकलनामध्ये ८ टक्के घटडिसेंबरपासून इलेक्ट्रॉनिक वे-बिलची सुविधा बंद

अविनाश कोळी सांगली : महापुराचा जबरदस्त फटका, नव्याने लागू झालेल्या कृषीमालासह विविध सेवांवरील सवलती यामुळे यंदाच्या वस्तू आणि सेवाकर (जीएसटी ) संकलनास मोठा फटका बसला आहे. एकीकडे देशभरात ६ टक्क्यांनी करसंकलन वाढले असताना, जिल्ह्यात गतवर्षाच्या तुलनेत करवसुलीत ८.४ टक्के घट दिसून येत आहे.जिल्ह्यात आॅगस्टपासून नोव्हेंबरपर्यंत चार महिन्यांत पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. सांगली जिल्ह्यातील बाजारपेठेला शेतीचा मोठा आधार आहे. शेतीच्या मोठ्या हानीमुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर विपरित परिणाम दिसून येत आहे. महापूर, परतीचा पाऊस, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाने गेल्या चार महिन्यांत जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठा दणका बसला आहे.

महापुरामुळे शेती, व्यापार, उद्योग, विविध व्यावसाय, शासकीय सेवा, रस्ते व इतर सुविधांचे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्याचे अर्थकारण कोलमडले आहे. त्याचा परिणाम आता जीएसटीच्या वसुलीवर झालेला दिसून येतो. त्याचबरोबर आॅक्टोबर २०१९ पासून कृषीमालाच्या साठवणुकीसह अभियांत्रिकी जॉबवर्क, निवासी हॉटेल्स, केटरिंग यांच्या जीएसटीमध्ये सवलत लागू झाली आहे.

जिल्ह्यात हळद आणि गुळाची मोठी उलाढाल होत असते. त्यांच्या साठवणुकीवरही मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. गोदामे करमुक्त झाल्याने त्यातून कोट्यवधीच्या करसवलतीचा दिलासा उत्पादकांना मिळाला आहे. याउलट तितका महसुली घाटा कर विभागाला सोसावा लागला आहे. अभियांत्रिकी जॉबवर्कच्या माध्यमातूनही जीएसटी वसुलीवर परिणाम होताना दिसत आहे. अशा अनेक कारणांनी जीएसटीच्या वसुलीत घट झाली आहे.कर वसुलीत वाढ करण्याच्या दृष्टीने ज्या करदात्यांची दोनपेक्षा जास्त विवरण पत्रे प्रलंबित आहेत, अशांना आता १ डिसेंबरपासून इलेक्ट्रॉनिक वे-बिलची सुविधा बंद केली आहे. कर वसुलीच्या दृष्टीने या विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :GST Officeमुख्य जीएसटी कार्यालयSangliसांगली