शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात : जिल्हाधिकारी काळम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 17:34 IST

वारणा व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाटबंधारे विभाग, महसूल, पोलीस हे सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या काळजीचे कारण नाही. जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात  आहे,  असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे केले.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात : जिल्हाधिकारी काळमपूर परिस्थितीचा घेतला आढावा

सांगली : वारणा व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाटबंधारे विभाग, महसूल, पोलीस हे सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या काळजीचे कारण नाही. जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात  आहे,  असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे केले.

नदीपात्रातील सखल भागातील नागरिकांनी दक्ष राहावे. नदीकाठच्या भागातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित स्थळी बांधावीत. वेळोवेळी होणाऱ्या नदीपात्रातील प्रवाहातील बदलांनुसार त्यांना माहिती देण्यात येईल, असे प्रतिपादन काळम यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित संभाव्य पूर परिस्थिती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय गिड्डे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, पाटबंधारे कार्यकारी अभियंता नामदेव करे, सर्व उपविभागीय अधिकारी, महसूल, पाटबंधारे, महावितरण, कृषि, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन, बीएसएनएल, परिवहन, आरोग्य आदि यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.आपत्तीच्या काळात संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वय ठेवावा. कोणत्याही स्थितीत जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, आपत्ती निवारणार्थ देण्यात आलेली सर्व साधनसामग्री अद्ययावत ठेवावी. ऐन वेळची धावपळ टाळावी, आपत्तीच्या काळात यंत्रणेतील त्रृटी सहन केल्या जाणार नाहीत, याची जाणीव ठेवून तात्काळ प्रतिसादासाठी तत्पर राहावे.

सर्व यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपत्तीच्या काळात आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडावीत. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आपल्या बाजूच्या तालुक्यांमधीलही सद्यस्थितीची अद्ययावत माहिती ठेवावी. जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या घटनेची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षाला द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी