शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

जि. प.वर काँग्रेसचा झेंडा फडकवा

By admin | Updated: August 6, 2016 00:27 IST

मोहनराव कदम : शिराळा येथे कार्यकर्त्यांची बैठक; निवडणूक ताकदीने लढणार

शिराळा : जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. शिराळा तालुक्यात काँग्रेस मजबूत असून येथील जनता काँग्रेसवर प्रेम करणारी आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी केले.शिराळा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख प्रमुख उपस्थित होते. तालुका काँग्रेस अध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.मोहनराव कदम म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला चांगले वातावरण आहे. मी प्रत्येक तालुक्याचा दौरा नुकताच पूर्ण केला आहे. त्याठिकाणच्या अडचणी समजावून घेतल्या आहेत. अडचणींची सोडवणूक निश्चितपणे केली जाईल. सर्वत्र चांगली स्थिती आहे. जिल्ह्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढवून जिंकून दाखवू.सत्यजित देशमुख म्हणाले, शिराळा विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम केले आहे. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल. कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्यादृष्टीने कामाला लागावे. तालुक्यामधील आमचे विरोधक भाजप लाटेवर विजयी झाले आहेत. भाजपकडून लोकांच्या अपेक्षा फोल ठरल्याने लोकांच्या मनामध्ये नाराजी पसरली आहे. या नाराजीतूनच जनता काँंग्रेस पक्षाला साथ देईल. या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आ. शिवाजीराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. अनेक विकास कामे मार्गी लावण्याबरोबरच अनेक कुटुंबांचा आधार बनत अनेक कुटुंबे उभी केली आहेत, हे जनता जाणून आहे.यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष हणमंतराव पाटील, माजी जि. प. सदस्य के. डी. पाटील, महादेव कदम, जिल्हा उपाध्यक्ष जयकर कदम, सतीश पाटील, सेवा दल अध्यक्ष तानाजी कुंभार, सम्राट शिंदे, अशोकराव पाटील, हातकणंगले लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष जयराज पाटील, संदीप जाधव, कैलास पाटील, अशोक गायकवाड, पी. जी. शिंदे, रमेश पाटील, मनोहर पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)नाराजीचा फायदा उचलाकाँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जोमाने लढण्याचे आवाहन यावेळी नेत्यांनी केले. शिराळा तालुक्यातील विरोधक भाजप लाटेवर विजयी झाले आहेत. भाजपकडून लोकांच्या अपेक्षा फोल ठरल्याने लोकांच्या मनामध्ये नाराजी पसरली आहे, असेही यावेळी सत्यजित देशमुख कार्यकर्त्याना म्हणाले.