शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुरग्रस्त कसबे डिग्रज, मौजे डिग्रज गावांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 16:28 IST

Flood Sangli : पुराच्या पाण्यामुळे धोकादायक किंवा पडायला झालेल्या घरांमध्ये कोणी रहायला जाणार नाही याची काळजी घ्या, नुकसान झालेल्या घरांचे व शेतीचे पंचनामे तात्काळ सुरु करा, धान्य वाटपाची कार्यवाही तात्काळ सुरु करा, शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, स्वच्छता व आरोग्य विषयक उपाय योजनांची कार्यवाही सुरु करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

ठळक मुद्देपुरग्रस्त कसबे डिग्रज, मौजे डिग्रज गावांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणीपूरग्रस्त कुटंबांना धान्य वाटप, पूरग्रस्त कुटुंबियांची घेतली भेट

सांगली : पुराच्या पाण्यामुळे धोकादायक किंवा पडायला झालेल्या घरांमध्ये कोणी रहायला जाणार नाही याची काळजी घ्या, नुकसान झालेल्या घरांचे व शेतीचे पंचनामे तात्काळ सुरु करा, धान्य वाटपाची कार्यवाही तात्काळ सुरु करा, शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, स्वच्छता व आरोग्य विषयक उपाय योजनांची कार्यवाही सुरु करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.पुरामुळे बाधीत मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज व मौजे डिग्रज या गावांची जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाहणी करुन पुरामुळे बाधित कुटुंबांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी पोलीस उपाधिक्षक अजित टिके, पोलीस निरिक्षक प्रशांत निसाणदार, अप्पर तहसिलदार अर्चना पाटील, संबधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, शासनाकडून आर्थिक मदतीचा शासन निर्णय झाल्यानंतर लगेच शासन नियमानुसार मदत वाटपाची कार्यवाही सुरु करण्यात येईल. पंचनामे गतीने करण्यासाठी महसूल, कृषी व इतर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी टीम तयार करुन पंचनाम्याची कार्यवाही लवकरात लवकर पुर्ण करावी. गावातील पाणी पुरवठ्याच्या योजना तात्काळ सुरु कराव्यात. गरज असल्यास तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल.यावेळी मौजे डिग्रज येथील स्थानिक नागरिकांनी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्येक पुराच्या वेळी पाण्याखाली जाते, त्यामुळे त्याचे कायमस्वरुपी स्थलांतरणाची कार्यवाही करावी. तसेच औषध फवारणीसाठीचे साहित्य उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थालांतरणाबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच औषध फवारणीसाठीचे साहित्य तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कसबे डिग्रज व मौजे डिग्रज गावातील पूरग्रस्त कुटंबांना धान्य वाटप केले. ज्या ठिकाणी पुराचे पाणी आले होते त्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थलांतरीत होऊन घरी परतलेल्या पूरग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली.

टॅग्स :floodपूरcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली