शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

जिल्हाधिकारी पहिल्याच दिवशी ‘अ‍ॅक्शन मोड’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:39 PM

नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. अभिजित चौधरी यांनी सूत्रे स्वीकारली. स्वागत स्वीकारताच त्यांनी प्रत्यक्ष कामकाजासही प्रारंभ केला. महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह

ठळक मुद्देअधिकाऱ्यांशी संवाद : संपूर्ण कार्यालयाची केली पाहणीकामात दिरंगाई न करण्याची कर्मचाºयांना सूचना, जनतेशीही केली चर्चा

सांगली : नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. अभिजित चौधरी यांनी सूत्रे स्वीकारली. स्वागत स्वीकारताच त्यांनी प्रत्यक्ष कामकाजासही प्रारंभ केला. महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह अधिकाºयांनी केलेल्या स्वागतानंतर कामास प्राधान्य देऊ म्हणत त्यांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागांना भेटी देत माहिती घेतली. त्यामुळे पहिल्यादिवशीच जिल्हाधिकारी ‘अ‍ॅक्शन मोड’वर आल्याचे अधिकारी, कर्मचाºयांना दिसून आले.

बुधवारी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. अभिजित चौधरी यांची नियुक्ती झाल्यानंतर रात्रीच उशिरा त्यांनी मावळते जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडून सूत्रे स्वीकारली होती. गुरुवारी सकाळी ते पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालयात येणार होते. याची उत्सुकता कर्मचारी व अधिकाºयांच्या चेहºयावर दिसून येत होती. त्यांचे आगमन होताच सर्वप्रथम महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर, नूतन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख आदींनी जिल्हाधिकाºयांचे स्वागत केले. कर्मचारी संघटना, तलाठी संघटनेच्या पदाधिकाºयांसह सर्वच कर्मचाºयांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. त्यांनी अधिकाºयांशी संवाद साधत सर्वांनी एकत्र येऊन काम करूया, कामात अडचण असेल तर प्रत्यक्ष सांगा; पण कामात दिरंगाई नको, असे सांगितले. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांशीही संवाद साधला.

या भेटीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांना भेटी देत माहिती घेतली. विभागाचे प्रमुख, कर्मचारी व कामकाजाची माहिती घेतली. त्याचवेळी उपस्थित सर्वसामान्य जनतेचीही त्यांनी भेट घेतली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या कक्षाला भेट देत त्यांनी निधी संकलनाची माहिती घेतली. प्रशासनातर्फे प्रभावीपणे सुरू असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंमलबजावणीबाबतही आढावा घेत त्यांनी प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केली.शहीद जवानांना जिल्हाधिकाºयांची मदतनूतन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागांना भेटी देताना शहीद जवान मदत कक्षालाही भेट दिली. यावेळी मल्लेवाडी (ता. मिरज) येथील ग्रामस्थांनी दिलेल्या १० हजार १०० रुपयांची मदत त्यांनी स्वीकारली. शिवाय या मदत कक्षाकडे स्वत:ही आर्थिक मदत देत आपली सामाजिक बांधिलकी जपली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली