शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

जिल्हा बँकेच्या २५ लाखांच्या लुटीचा छडा; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:31 IST

तासगाव : सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या विसापूर शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून २५ लाखांची रोकड लंपास करण्याची घटना १२ ...

तासगाव : सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या विसापूर शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून २५ लाखांची रोकड लंपास करण्याची घटना १२ जून रोजी जिरवळमळा (विसापूर, ता. तासगाव) येथे घडली होती. याप्रकरणी चार महिन्यांनंतर तासगाव पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.जिल्हा बँकेचा लिपिक शैलेश शिवाजी गायकवाड (रा. बुधगाव, ता. मिरज) आणि सादिक ताजुद्दीन शेख (रा. गार्डी, मूळ गाव इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणातील आणखी दोन-तीन संशयित पंजाब येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक पंजाबला पोहोचले आहे.याबाबत माहिती अशी, १२ जून रोजी जिल्हा बँकेच्या विसापूर शाखेचे दोन कर्मचारी तासगाव येथे बँकेच्या मुख्य शाखेत रोकड नेण्यासाठी आले होते. पोत्यात २५ लाखांची रक्कम भरून ती दुचाकीवर ठेवून नेत असताना,जिरवळ मळ्याजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी धक्काबुक्की करून, डोळ्यात चटणी टाकून रक्कम लंपास केली. तासगाव तालुक्यात पहिल्यांदाच दिवसाढवळ्या इतक्या मोठ्या रकमेच्या लुटीची घटना घडली होती. संशयितांचे रेखाचित्र वगळता कोणताही ठोस पुरावा पोलिसांकडे नव्हता.चार महिन्यांपासून पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्याकडून तपास सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलच्या सीडीआर रिपोर्टवरून या चोरीच्या संशयाची सुई हातनूर शाखेतील जिल्हा बॅँकेचा कर्मचारी शैलेश गायकवाडवर गेली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर उलगडा झाला. त्यानंतर चोरीत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सादिक शेख यालाही ताब्यात घेतले. दोघांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अन्य संशयित पंजाबमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक पंजाबमध्ये पोहोचले आहे.असा झाला उलगडाघटनेदिवशी जिल्हा बॅँकेच्या तासगाव शाखेतील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता; मात्र बाजार समितीच्या आवारातील सीसीटीव्ही सुरू होता. बँकेपासून विसापूर शाखेपर्यंतचे उपलब्ध असणारे सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. चोरीवेळी बॅँकेचे लोकेशन असणाºया १०५ मोबाईल संभाषणाचे सीडीआर फुटेज तपासण्यातआले. त्यामध्ये संशयित शैलेश गायकवाड याचा समावेश होता. चोरीची घटना घडली, त्यावेळी गायकवाडच्या मोबाईलवरून १७ वेळा फोन झाला होता. याच संशयावरून त्याला ताब्यात घेतले. तो त्यावेळी हातनूर शाखेत लिपिक म्हणून कार्यरत होता. चोरीच्या घटनेवेळी तो तासगावच्या मुख्य शाखेत दोन हजार रुपयांची नोट बदलण्याच्या बहाण्याने आला होता.मार्चमध्ये रेकी; मेहुण्याचा सहभागमार्च महिन्यात शैलेश गायकवाड, अन्य एका कर्मचाºयासोबत हातनूर शाखेसाठी तासगाव शाखेतून दहा लाखांची रक्कम घेऊन निघाला होता. त्यावेळी शैलेशचा गार्डी येथील मेहुणा वाटेत भेटला होता. इतकी मोठी रक्कम कशी घेऊन जाता, अशी विचारणा करून त्याने रेकी केली होती. नंतर याच मेहुण्याने साथीदारासमवेत २५ लाखांवर डल्ला मारून पंजाबला पलायन केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.