शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा, कोयना, वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, एनडीआरएफचे दोन पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 14:24 IST

कृष्णा,कोयना,वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रमुख धरणामधून होणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आर्यविन पूल येथे पाणी पातळी वाढली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये एनडीआरएफचे दोन पथक दाखल झाले असून एक पथक आष्टा येथे व एक सांगली येथे तयारीत ठेवण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देकृष्णा,कोयना,वारणा नदीकाठच्या गावांना सावध रहाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा, एनडीआरएफचे दोन पथक दाखल

सांगली : कृष्णा,कोयना,वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रमुख धरणामधून होणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आर्यविन पूल येथे पाणी पातळी वाढली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये एनडीआरएफचे दोन पथक दाखल झाले असून एक पथक आष्टा येथे व एक सांगली येथे तयारीत ठेवण्यात आलेले आहे.

नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील नदीकाठावरील व सखल भागातील लोकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे खबरदारीची उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये एनडीआरएफचे दोन पथक दाखल झाले असून एक पथक आष्टा येथे व एक सांगली येथे तयारीत ठेवण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यातबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.

सद्यस्थितीत नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष क्रमांक 1077 व 0233-2600500 व पाटबंधारे नियंत्रण कक्ष 0233-2301820/2302925 वरती संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी सतर्क रहावेकृष्णा,कोयना,वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 6 वा कृष्णा नदीची आर्यविन पूल येथे पाणी पातळी 27.10 फुट इतकी होती.

सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रमुख धरणामधून होणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे दिनांक 17 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत कृष्णा नदीची आर्यविन पूलाची पाणीपातळी अंदाजे 38 ते 40 फुट इतकी होण्याची शक्यता आहे.

नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे असे आवहन सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ना. शं. करे यांनी केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, वेळोवेळी अद्यावत माहिती कळविण्यात येईल असे त्यांनी कळविले आहे. 

टॅग्स :floodपूरKoyana Damकोयना धरणSangliसांगली