लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : समाजोपयोगी कामामध्ये अग्रेसर असलेले डॉ. स्वप्नील चोपडे व इंडियन डेंटल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने येथील वृद्ध सेवाश्रमामध्ये ५० वाफेच्या मशीन्सचे जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते वाटप केले.
सध्याच्या काळात वृद्ध लोकांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना असोसिएशनतर्फे उपयोगी असलेल्या वाफेच्या मशीन्स देण्याचे ठरवले होते. त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या मशीन्सचे वाटप करण्यात आले. यावेळी ध्वजारोहण समारंभ डॉ. चोपडे यांचे हस्ते करण्यात आला. चोपडे यांनी असोसिएशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उपक्रमाची माहिती दिली.
जिल्हापरिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, माजी आमदार शरद पाटील यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमास असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रामदास हजारे, सदस्य डॉ. अनिल पाटील, डॉ. सचिन उदगावे, डॉ. गणेश चौगुले, डॉ. संदीप पाटील, डॉ. प्रियांका लवटे उपस्थित होते.