वाटेगाव : जयंत दारिद्र्य निर्मूलनाच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहीन, असे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले.
वाटेगाव (ता. वाळवा) येथे जयंत दारिद्र्य निर्मूलनच्या माध्यमातून गरीब, अनाथ, वृद्ध, विधवा, परित्यक्ता, श्रावण बाळ, दिव्यांग यांना संजय गांधी निराधार योजनेमधून मंजूर झालेल्या पेन्शन पत्रांचे वाटप योजनेचे संजय पाटील, सरपंच सुरेश साठे, उपसरपंच शुभांगी पाटील, प्रकाश पाटील, संपतराव पाटील, संदीप साठे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा ऐतवडेकर, सुवर्णा साळुंखे, मधुकर कुंभार, बाळासाहेब खराडे, दिलीप कापसे, भानुदास खराडे, जयंत दारिद्र्य निर्मूलनचे विभागीय संघटक संदीप साठे, दिनेश जाधव, समीर जाधव यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
फोटो - ०७०२२०२१-आयएसएलएम- वाटेगाव न्यूज
वाटेगाव येथे संजय गांधी पेन्शन पत्राचे वाटप करताना संजय पाटील, उपसरपंच शुभांगी पाटील, प्रकाश पाटील.