फोटो ओळ : भिलवडी स्टेशन (ता. पलूस) येथे कोरोना सेफ्टी किटच्या वाटपप्रसंगी कृषी राज्यमंत्री डॉ .विश्वजित कदम व युवक कार्यकर्ते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : भिलवडी स्टेशन (ता. पलूस) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने घरोघरी कोरोना किटचे वाटप केले. गावात कोरोना रुग्ण वाढत असल्याने ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून हा उपाय केला आहे.
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी भिलवडी स्टेशन गावास नुकतीच भेट देऊन पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने योग्य ती दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची सूचना केली होती. कदम यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर माजी सरपंच नंदकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सॅनिटाइझर, मास्क, साबण, व्हिटॅमिन सी व झिंकच्या गोळा आदी किट वाटप करण्यात आले. यावेळी नंदकुमार कदम, सरपंच सावित्री यादव, उपसरपंच राजेश जाधव, ग्रामसेविका मनीषा कांबळे,
तंटामुक्तीचे अध्यक्ष जयकर जाधव, विलास यादव, संतोष मोरे, रितेश कांबळे, शिरीष पवार, विजय माळी आदी उपस्थित होते.