शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी जागेत अतिक्रमण, सांगली जिल्ह्यातील किंदरवाडीत सरपंचांसह तीन सदस्यांवर अपात्रतेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 17:00 IST

पोटनिवडणूक की प्रशासकराज?

तासगाव : तासगाव तालुक्यात राजकीयदृष्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या किंदरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह इतर तीन सदस्यांवर सरकारी जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.तासगाव तालुक्यातील किंदरवाडी ही सात सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत ही ग्रामपंचायत झाली होती. मात्र, तक्रारदार नारायण सूर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे चार  सदस्यांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. यात म्हटले होते की, किंदरवाडी ग्रामपंचायतच्या चार सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केले असून सरकारी जागेचा बेकायदा वापर व उपभोग घेतला आहे. त्यामुळे कायद्याने अपात्र असल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे. यासाठी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १६ व १४   (१) (ज ३) चा संदर्भ देण्यात आला.या अर्जावर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या दालनात वेळोवेळी सुनावणी झाली. अर्जदारांनी सादर केलेली कागदपत्रे तपासून जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदारांचा विवाद अर्ज मंजूर करून सरपंच राजश्री कचरे, अनिता कचरे, धोंडीराम कचरे व शोभा जाधव या चार सदस्यांना सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरवत त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले. या आदेशात संबधितांना प्रस्तूत आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल करण्यास १५ दिवसांचा अवधी देत असल्याचे म्हटले आहे.पोटनिवडणूक की प्रशासकराज?ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह तीन सदस्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केल्याने तासगाव तालुक्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर संबंधितांच्या प्रभागात पोटनिवडणूक लागणार की ग्रामपंचायतीवर प्रशासकराज येणार? याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत