शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

रोगांनी द्राक्षबागा निकामी, औषधे कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:27 IST

बिघडलेल्या हवामानाने संकटग्रस्त झालेल्या द्राक्ष बागायतदारांना आता मानवी संकटांची मगरमिठी बसली आहे. रोगांच्या हल्ल्याने द्राक्षबागा उद्ध्वस्त होत असताना त्या वाचविण्यासाठी आणलेली औषधेच कुचकामी ठरत आहेत. निसर्गाच्या संकटापेक्षा बोगस औषधांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचे हे संकट अशा बोगस औषध कंपन्यांसाठी सुकाळ ठरत आहे.

ठळक मुद्देरोगांनी द्राक्षबागा निकामी, औषधे कुचकामीबोगस औषध कंपन्यांसाठी सुकाळ

दत्ता पाटील तासगाव : बिघडलेल्या हवामानाने संकटग्रस्त झालेल्या द्राक्ष बागायतदारांना आता मानवी संकटांची मगरमिठी बसली आहे. रोगांच्या हल्ल्याने द्राक्षबागा उद्ध्वस्त होत असताना त्या वाचविण्यासाठी आणलेली औषधेच कुचकामी ठरत आहेत. निसर्गाच्या संकटापेक्षा बोगस औषधांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचे हे संकट अशा बोगस औषध कंपन्यांसाठी सुकाळ ठरत आहे.तासगाव तालुक्यात द्राक्षक्षेत्र मोठे आहे. एक एकर द्राक्षबागेसाठी सुमारे एक लाख रूपये केवळ औषधांवर खर्च होतात. वाढत्या महागाईत औषधांचेही दर वाढले आहेत. द्राक्षबागांसाठी आंतरराष्ट्रीय  औषध कंपन्यांपासून अगदी लोकल कंपन्यांपर्यंत औषधांची निर्मिती करून विक्री केली जाते. यंदा द्राक्ष हंगामात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोगांचा सामना करावा लागत आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांना रोगांनी घेरले आहे.द्राक्षबागा जतन करण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या जिद्दीने औषध फवारणीसाठी धडपड सुरु असते. कोणताही विचार न करता, अनेक महागडी आणि बाजारात उपलब्ध असणारी औषधे फवारणी करून बागा जतन करण्यासाठी धडपड सुरु आहे. पण बागा वाचवण्यासाठी फवारणी केलेल्या औषधांना गुणवत्ताच नसल्याने, हजारो रुपये खर्ची करूनही काही औषधांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव अनेक द्राक्ष बागायतदारांना आला आहे. त्यामुळे हजारो रुपये खर्च करूनही द्राक्षबागांना रोगांचा फटका बसतच आहे.तासगाव तालुक्यात अनेक बोगस औषधांची राजरोसपणे विक्री सुरु आहे. काही बनावट कंपन्यांमार्फतही औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. बोगस औषधांप्रमाणेच बोगस औषध कंपन्यांचाही सुळसुळाट झाला आहे. केवळ लेबल लावून कंपनी प्रॉडक्ट असल्याचे भासवून अनेक बोगस औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत.

टॅग्स :fruitsफळेSangliसांगली