शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रोगांनी द्राक्षबागा निकामी, औषधे कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:41 IST

बिघडलेल्या हवामानाने संकटग्रस्त झालेल्या द्राक्ष बागायतदारांना आता मानवी संकटांची मगरमिठी बसली आहे. रोगांच्या हल्ल्याने द्राक्षबागा उद्ध्वस्त होत असताना त्या वाचविण्यासाठी आणलेली औषधेच कुचकामी ठरत आहेत. निसर्गाच्या संकटापेक्षा बोगस औषधांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचे हे संकट अशा बोगस औषध कंपन्यांसाठी सुकाळ ठरत आहे.

ठळक मुद्देरोगांनी द्राक्षबागा निकामी, औषधे कुचकामीबोगस औषधे शेतकऱ्यांच्या माथी

दत्ता पाटील तासगाव : बिघडलेल्या हवामानाने संकटग्रस्त झालेल्या द्राक्ष बागायतदारांना आता मानवी संकटांची मगरमिठी बसली आहे. रोगांच्या हल्ल्याने द्राक्षबागा उद्ध्वस्त होत असताना त्या वाचविण्यासाठी आणलेली औषधेच कुचकामी ठरत आहेत. निसर्गाच्या संकटापेक्षा बोगस औषधांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचे हे संकट अशा बोगस औषध कंपन्यांसाठी सुकाळ ठरत आहे.तासगाव तालुक्यात द्राक्षक्षेत्र मोठे आहे. एक एकर द्राक्षबागेसाठी सुमारे एक लाख रूपये केवळ औषधांवर खर्च होतात. वाढत्या महागाईत औषधांचेही दर वाढले आहेत. द्राक्षबागांसाठी आंतरराष्ट्रीय  औषध कंपन्यांपासून अगदी लोकल कंपन्यांपर्यंत औषधांची निर्मिती करून विक्री केली जाते.यंदा द्राक्ष हंगामात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोगांचा सामना करावा लागत आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांना रोगांनी घेरले आहे. द्राक्षबागा जतन करण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या जिद्दीने औषध फवारणीसाठी धडपड सुरु असते. कोणताही विचार न करता, अनेक महागडी आणि बाजारात उपलब्ध असणारी औषधे फवारणी करून बागा जतन करण्यासाठी धडपड सुरु आहे.

पण बागा वाचवण्यासाठी फवारणी केलेल्या औषधांना गुणवत्ताच नसल्याने, हजारो रुपये खर्ची करूनही काही औषधांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव अनेक द्राक्ष बागायतदारांना आला आहे. त्यामुळे हजारो रुपये खर्च करूनही द्राक्षबागांना रोगांचा फटका बसतच आहे.तासगाव तालुक्यात अनेक बोगस औषधांची राजरोसपणे विक्री सुरु आहे. काही बनावट कंपन्यांमार्फतही औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. बोगस औषधांप्रमाणेच बोगस औषध कंपन्यांचाही सुळसुळाट झाला आहे. केवळ लेबल लावून कंपनी प्रॉडक्ट असल्याचे भासवून अनेक बोगस औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत.

टॅग्स :fruitsफळेSangliसांगली