शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

जादा टक्केवारीच्या परिणामांवर राजकीय वर्तुळात रंगताहेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:13 PM

सांगली : मतदान वाढीसाठी चालविलेले प्रशासकीय अभियान, उमेदवारांमधील जोरदार चुरस यांचा सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदान वाढीवर अपेक्षेपेक्षा कमी परिणाम ...

सांगली : मतदान वाढीसाठी चालविलेले प्रशासकीय अभियान, उमेदवारांमधील जोरदार चुरस यांचा सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदान वाढीवर अपेक्षेपेक्षा कमी परिणाम झाला. तरीही २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा दोन टक्क्यांनी मतदानात वाढ झाली असून, वाढलेल्या टक्क्याचा नेमका कोणावर, किती परिणाम होणार, याचे तर्कवितर्क करीत मतदारसंघात चर्चा रंगल्या आहेत.सांगली लोकसभा मतदारसंघात यंदा प्रशासनाने प्रभावी मोहीम राबवित मतदान वाढीसाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर तुल्यबळ उमेदवार, त्यांच्या माध्यमातून निर्माण झालेली चुरस, दिग्गज नेत्यांच्या सभांनी तापलेले वातावरण याचा परिणाम मतदान वाढीवर मोठ्या प्रमाणावर होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षा कमी मतदान वाढ झाल्याचे चित्र मंगळवारी समोर आले. सांगली लोकसभा मतदारसंघात यंदा १८ लाख ३ हजार ५४ मतदार होते. यातील ११ लाख ७८ हजार ८१४ इतके मतदान मंगळवारी झाले. याची टक्केवारी ६५.३८ इतकी होते. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ६३.४७ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मतदान वाढले असले तरी, ही वाढ अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येते.वाढलेली टक्केवारी आता कोणाच्या राजकीय जीवनावर कितपत परिणाम करणारी ठरणार, मताधिक्याचे गणित कसे बदलणार, किती मतदान मिळाले तर उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, अशा एक ना अनेक प्रश्नांभोवती चर्चा रंगल्या आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात आता महिनाभर या चर्चा सुरू राहणार आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात आजअखेर सर्वाधिक मतदान १९९९ मध्ये ६८.४७ टक्के इतके नोंदले गेले होते. हा विक्रम अजूनही अबाधित आहे.भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज भाजप नेत्यांच्या सभा ज्या तासगाव मतदारसंघात झाल्या, तेथेच मतदानाची आकडेवारी घटल्याचे दिसत आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सर्वाधिक चुरस जाणवत असतानाही, येथील टक्का घसरल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क सुरू झाले आहेत.