आटपाडी : आटपाडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ३१ लाखांच्या बकऱ्याचीच जास्त चर्चा रंगली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना या बकऱ्याची पाहणी करत मालकासह बकऱ्याचा सन्मान केला आहे.आकर्षक व जातिवंत असणारे माडग्याळ जातीच्या एवढ्या दोन महिने वय असलेल्या ३१ लाख रुपयांची मागणी झाली आहे. या बकऱ्याचा सन्मान शेतकरी मेळाव्यात करण्यात आला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, नितीन बानुगडे पाटील यांना या बकऱ्याचे कुतूहल निर्माण झाले.तोंड व नाकाचा विशिष्ट आकारआटपाडी दुष्काळी तालुका असला तरी जातिवंत खिलार गाय, बैल यासह शेळ्या - मेंढ्या यासाठी प्रसिद्ध आहे. माडग्याळ जातीच्या मेंढ्यांना मागील काही वर्षांपासून प्रसिद्धी मिळाली आहे. इतर मेंढ्यांपेक्षा वेगळी ठेवण, सुंदर दिसणारे तोंड व नाकाचा आकार विशिष्ट असल्याने या मेंढ्याना बाजारात खूप मागणी आहे.
पोपटासारखी चोच, आटपाडीच्या ३१ लाखांच्या बकऱ्याचीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 18:29 IST