शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

धीरज पाटील याचेही बँक खाते गोठविले, व्हिसा फसवणूक प्रकरणी कसून चौकशी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 14:58 IST

मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेला पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याचा फरारी साथीदार धीरज पाटील (रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) याचे स्टेट बँकेच्या दक्षिण शिवाजीनगर शाखेतील बँक खाते पोलिसांनी शनिवारी गोठविले.

सांगली - मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेला पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याचा फरारी साथीदार धीरज पाटील (रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) याचे स्टेट बँकेच्या दक्षिण शिवाजीनगर शाखेतील बँक खाते पोलिसांनी शनिवारी गोठविले. त्याच्या बँक खात्यावरील सर्व आर्थिक व्यवहाराची माहिती मागविली आहे. कौस्तुभ पवार व त्याचा मित्र धीरज पाटील या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरुनाथ कुंभार (रा. शिरवळ, जि. सोलापूर), मोहन शिंदे (बेलवंडी, जि. अहमदनगर), दीपक माने (मानेवाडी, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये घेतले. मलेशियात गेल्यानंतर या तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली. वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशिया पोलिसांनी या तरुणांना अटक केली. गेल्या आठवड्यात हा प्रकार उघडकीस आला होता. दोन दिवसापूर्वी पोलिसांनी कौस्तुभ पवारला अटक केली होती. त्याचेही कोटक महिंद्र बँकेच्या सांगली शाखेतील खाते गोठविले आहे. कौस्तुभ पवार हा धीरजकडे तरुणांना घेऊन जात होता. त्याबदल्यात धीरजकडून त्याला कमिशन मिळत होते, अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे.धीरजच मास्टरमार्इंडया व्हिसा प्रकरणाचा मास्टरमार्इंड धीरज पाटील हाच असल्याची माहिती तपासात समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी धीरज पाटील हा मलेशिया येथे गेला होता. यावेळी परदेशी तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणाºया काही व्यक्तींशी त्याची ओळख झाली. तेथून भारतात परतल्यानंतर त्याने थेट मलेशियामध्ये रोजगार देण्याचा व्यवसायच सुरू केला. त्याचा हा व्यवसाय अनेक दिवसांपासून बिनबोभाटपणे सुरू होता. मात्र या फसवणूक प्रकरणामुळे तो उघडकीस आला.

टॅग्स :bankबँक