ऐतवडे बुद्रुक : ढगेवाडी (ता. वाळवा) येथील सरपंच गौरी विशांत कचरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे त्यांना पदावरून दूर व्हावे लागले. दरम्यान, नवीन सरपंच निवड मंगळवारी (दि. ९) होणार आहे. सरपंचपद महिला राखीव आहे. सध्या एकूण चार महिला सदस्य आहेत. त्यामुळे यापैकी कोणत्या महिलेची निवड सरपंचपदी होणार याची उत्सुकता ग्रामस्थांना लागली आहे.
येथील लोकनियुक्त महिला सरपंच गौरी विशात कचरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे त्यांना पदावरून दूर व्हावे लागले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी येथील सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मंगळवारी (दि. ९) नवीन सरपंच निवड होणार आहे. येथील एकूण सदस्य संख्या सात आहे. त्यापैकी मनीषा खोत, तेजश्री माने, सुशीला जाधव, सुजाता खोत या चार महिला सदस्य आहेत. सुशीला जाधव यांच्या नावाची सरपंच पदासाठी चर्चा असून, त्यांची सरपंचपदी निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.