शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

जंतनाशक दिन मोहिम 1 मार्चला व मॉप अप दिन 8 मार्चला राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 19:26 IST

Health Sangli- राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम सांगली जिल्ह्यामध्ये दि. 1 मार्च 2021 रोजी व मॉप अप दिन 8 मार्च 2021 रोजी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत 1 ते 19 वर्षे वयोगटातील लाभार्थींना अल्बेंडेझॉल ची गोळी (जंतनाशक गोळी) देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांनी दिली.

ठळक मुद्देजंतनाशक दिन मोहिम 1 मार्चला व मॉप अप दिन 8 मार्चला राबविणार1 ते 19 वर्षे वयोगटातील लाभार्थींना जंतनाशक गोळी देण्यात येणार- डॉ. मिलींद पोरे

सांगली : राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम सांगली जिल्ह्यामध्ये दि. 1 मार्च 2021 रोजी व मॉप अप दिन 8 मार्च 2021 रोजी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत 1 ते 19 वर्षे वयोगटातील लाभार्थींना अल्बेंडेझॉल ची गोळी (जंतनाशक गोळी) देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांनी दिली.1 ते 19 वर्षे वयोगटातील किमान 28 टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहेच. तसेच बालकांची शारिरीक व बौध्दिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते.

ही बाब लक्षात घेवून 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व शालेय विद्यार्थी (शाळेतील व शाळाबाह्य) यांना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश आहे.या वर्षातील दुसऱ्या टप्प्याच्या जंतनाशक मोहिमेची अंमलबजावणी 1 मार्च राष्ट्रीय जंतनाशक दिन व 8 मार्च मॉप अप दिन संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविला जाणार आहे. या मोहिमेसाठी लागणारा औषधसाठा प्राप्त झाला असून ग्रामीण क्षेत्रातील 5 लाख 4 हजार 455, नगरपालिका क्षेत्रातील 64 हजार 425 व महानगरपालिका क्षेत्रातील 1 लाख 21 हजार 578 असे एकूण 6 लाख 90 हजार 458 लाभार्थी आहेत.

या मोहिमेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर आरोग्य अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक व सेविका, साधन शिक्षक, आशा यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. ही मोहिम अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये 3 हजार 56 अंगणवाडी सेविका, 2 हजार 868 साधन शिक्षक, 2 हजार 69 आशा व 896 आरोग्य कर्मचारी सहभागी आहेत.1 ते 2 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना 200 मिलीग्रॅमची गोळी चुरा / पावडर करूनच पाण्याबरोबर देण्यात येईल. 2 ते 19 वयोगटातील मुला-मुलींना 400 मिलीग्रॅमची गोळी चुरा / पावडर अथवा तुकडे करून चावून खाण्यास स्वच्छ पाण्याबरोबर देण्यात येणार आहे. ॲल्बेंडेझॉल गोळी उपाशीपोटी देण्यात येणार नाही.

गोळी खाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तथापी जंताचा प्रादुर्भाव (भुक कमी, वजन कमी आणि गालावर पांढरे चट्टे) असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जावू नये. अंगणवाडी व शाळेतील सर्व मुलांना गोळी खाण्यास दिल्यापासून दोन तास संपेपर्यंत मुलांना त्रास आहे किंवा कसे याची खात्री अंगणवाडी सेविका/आरोग्स सेवक/सेविका/साधन शिक्षक/आरोग्य सहाय्यक झ्र सहाय्यीका यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.पालकांनी घाबरून न जाता कोणत्याही वयोगटातील मुलांना त्रास होत असल्यास त्वरीत आशा/ आरोग्य सेविका / सेवक / आरोग्य सहाय्यिका / सहाय्यक / साधन शिक्षक अथवा वैद्यकिय अधिकारी (प्राथमिक आरोग्य केंद्र) यांच्याशी संपर्क साधावा. आजारी असणारे बालक / किशोर / किशोरी यांना जंतनाशक दिनी / मॉप अप दिनी ॲल्बेंडेझोलची गोळी (जंतनाशक गोळी) देण्यात येणार नाही.

तथापी त्यांना ते पूर्णत: बरे झाल्यानंतर जंतनाशक गोळी वैद्यकिय अधिकारी यांच्या सल्ल्याने देण्यात येणार आहे. 1 मार्च रोजी अल्बेंडेझॉलची गोळी काही कारणाने घेतली नसल्यास दि. 8 मार्च मॉप अप राऊंड दिवशी ही गोळी देण्यात येणार असल्याचे डॉ. पोरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Healthआरोग्यSangliसांगली