शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

देवेंद्र फडणवीस मंगळवारी खानापूर-आटपाडी दौऱ्यावर

By admin | Updated: October 25, 2015 00:42 IST

कामांची पाहणी होणार : अग्रणीसह जलयुक्त शिवाराला भेट

विटा : दुष्काळी खानापूर विधानसभा मतदारसंघात विविध जलसंधारण कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, दि. २७ आॅक्टोबरला खानापूर व आटपाडी तालुक्यांच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने राजकीयदृष्ट्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. खानापूर तालुक्यात लोकसहभाग व शासनाच्या सहकार्यातून अग्रणी नदीपात्राचे सुमारे २० कि.मी.चे रूंदीकरण व खोलीकरण करून पुनरुज्जीवन केले आहे. राज्यातील या आदर्श अग्रणी पॅटर्नची व आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी, पिंपरी बुद्रुक येथील जलयुक्त शिवार योजनेची पाहणी फडणवीस करणार आहेत. तेथून खानापूर तालुक्यातील सुलतानगादे, तामखडी फाटा, जाधववाडी, विठ्ठलनगर, बलवडी (खा.), बेणापूर येथील अग्रणीच्या कामांची पाहणी करतील. त्यानंतर ते जतकडे जाणार आहेत. (वार्ताहर) पडळकरवाडीतून होणार सुरूवात फडणवीस यांचे मंगळवारी सकाळी १० वाजता आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी येथे हेलिकॉप्टरने आगमन होईल. सकाळी १० ते १०.२० पर्यंत पडळकरवाडी व पिंपरी बुद्रुक येथील जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामांची पाहणी, त्यानंतर सकाळी अकरापर्यंत शेतकऱ्यांशी संवाद साधतील. सकाळी ११.४० वाजता सुलतानगादे (ता. खानापूर) येथील पुलावरून अग्रणी नदीच्या कामाची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी १.२० वाजेपर्यंत तामखडी फाटा, जाधववाडी चौक, पवार मळा येथे लोकसहभागातून झालेल्या कामांची पाहणी करतील. पवार मळा (बलवडी) येथे भवानी मंदिराजवळ शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर शिवेवरचा बंधारा, विठ्ठलनगर व बेणापूर येथे अग्रणी नदीच्या कामाची पाहणी करून दुपारी तीन वाजता जत तालुक्यातील बिरनाळकडे प्रयाण करणार आहेत. तेथेही सिमेंट नालाबांध कामांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तेथून ते थेट सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहेत.