शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येईनात; सांगलीतील विकासकामांची उद्घाटने होईनात

By शीतल पाटील | Updated: November 25, 2023 13:25 IST

शीतल पाटील सांगली : विकासकामांच्या उद्घाटनाला नेते, मंत्री हवेत, असा आग्रह सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते धरतात. त्यात चुकीचेही काही ...

शीतल पाटीलसांगली : विकासकामांच्या उद्घाटनाला नेते, मंत्री हवेत, असा आग्रह सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते धरतात. त्यात चुकीचेही काही नाही; पण काहीवेळा मंत्री, नेत्यांचा दौरा लांबणीवर जातो आणि कामांची उद्घाटनेच होत नाहीत. असाच काही प्रकार सांगलीत सुरू आहे. नवीन पोलिस मुख्यालय बांधून तयार आहे; पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस हेच उपलब्ध नसल्याने पाच महिन्यांपासून उद्घाटन झालेले नाही. नवीन नाट्यगृहाचे या दोन्ही नेत्यांच्या हस्ते भूमिपूजनाचाही घाट घातला आहे; पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काही सांगलीला येईनात आणि उद्घाटने काही होईनात, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नवीन पोलिस मुख्यालयविश्रामबाग येथील पोलिस मुख्यालयाची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारतीला मंजुरी मिळाली. दोन वर्षांत दिमाखदार नवीन इमारतही उभी राहिली. नव्या इमारतीमुळे सर्वच विभागांचे काम एकाच ठिकाणाहून सुरू होणार आहे. नवीन मुख्यालय तयार होऊन पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला; पण अद्याप त्याचे उद्घाटन झालेले नाही. उद्घाटनाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस हवेत, असा भाजपचा आग्रह आहे.

कुपवाड ड्रेनेज योजनाकुपवाड शहरासाठी अडीचशे कोटींची ड्रेनेज योजना मंजूर झाली असून निविदाही काढण्यात आली. ठेकेदाराकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. निविदा मंजूर होऊन तीन महिने झाली तरी अद्याप योजनेचा शुभारंभ झालेला नाही. कारण काय तर उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही.

महापालिकेचे नवीन नाट्यगृहमहापालिकेच्या जागेत नवीन नाट्यगृह उभारणीसाठी २५ कोटींचा निधी मिळाला आहे. महापालिकेच्या तांत्रिक मंजुरीनंतर आता प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. तत्पूर्वीच नाट्यगृहाचे भूमिपूजन करण्याचा भाजपचा विचार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हवेत.

हरिपूर-कोथळी पूलहरिपूर-कोथळीदरम्यान कृष्णा नदीवर नवीन पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार होते; पण ते काही सांगली दौऱ्यावर आले नाहीत. शेवटी पुलाचे उद्घाटन करून तात्पुरती वाहतूक सुरू करण्यात आली.

..आता अधिवेशनानंतरच मुहूर्त‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगली दौऱ्यावर येणार होते. तेव्हा या विकासकामांची उद्घाटने घेण्याचा भाजपाचा प्रयत्न होता; पण जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमच झाला नाही. त्यामुळे दोन्ही नेते सांगली दौऱ्यावर आले नाहीत. आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतरचा मुहूर्त काढण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीChief Ministerमुख्यमंत्री