शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लातूरचा देशमुख वाडा काँग्रेससोबतच राहणार: अमित देशमुख, भाजप प्रवेशाची ऑफर धुडकावली

By शीतल पाटील | Updated: January 13, 2023 15:22 IST

आमदार अमित देशमुख यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पडदा टाकला.

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा: सद्याच्या पाच वर्षातील हे तिसरे सरकार आहे. पहिले अडीच दिवसाचे, दुसरे अडीच वर्षाचे आणि सध्याचे तिसरे सरकार आहे. पण चौथे कधी येईल, काही सांगता येत नाही. कितीही संकटं आणि वादळं आली तरी लातूरचा देशमुखवाडा आहे तिथेच राहणार आहे, असे स्पष्ट करीत आमदार अमित देशमुख यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पडदा टाकला.

विटा येथे गुरुवारी सायंकाळी सेंद्रीय शेतीचे अभ्यासक जयंत बर्वे यांचा कृतज्ञता सोहळा आणि नेचर केअर फर्टिलायझर्स कंपनीच्या रौप्यमहोत्सवी वर्ष व पुरस्कार वितरण सोहळ्यात आ. देशमुख बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील यांनी भाजप प्रवेशाची दिलेली ऑफर त्यांनी थेट धुडकावून लावली. उलट तुम्हीच आमच्या घरी (काँग्रेस) परत या, असा सल्ला दिला. या कार्यक्रमास आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, जयदेव बर्वे, कामाक्षी बर्वे उपस्थित होते.

खासदार संजय पाटील म्हणाले, तुम्ही सांगली जिल्ह्यात आला आहात. या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी विशेष जिव्हाळा राहिला आहे. बर्वे यांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित आहात. त्यांच्या बर्वे वाड्यात गेली ३० वर्षे संघाची शाखा चालते. तुमचे घराणे काँग्रेसचे व मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे या घरच्या कार्यक्रमात तुम्हाला भाजपमध्ये या, असे जाहीर निमंत्रण दिले.त्यावेळी आमदार देशमुख यांनी ही ऑफर धुडकावत कितीही संकटे आणि वादळे आली तरी लातूरचा देशमुखवाडा आहे तिथेच राहणार आहे. ही संस्काराची श्रीमंती विलासराव देशमुख यांनी आम्हाला दिली आहे. त्यामुळे तुम्हीच स्वगृही यावे आणि त्याची सुरुवात विट्याच्या बर्वे वाड्यातून व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

शांतता कोर्ट सुरू आहे

आ. देशमुख यांनी खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्याकडे पाहत आताचे जे सरकार आले आहे, त्या सरकारचे तुम्ही काय नाव ठेवले आहे ? असा प्रश्न केला. त्यावर आमदार बाबर यांनी भाजप-सेना असे उत्तर दिले. त्यावर लगेच आ. देशमुख यांनी शिवसेना शिंदे गट – भाजप असे आता तरी म्हणावे लागेल. कारण मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी शेवटी हे सगळे सर्वोच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे शांतता राखा कोर्ट सुरू आहे, असा टोलाही आमदार देशमुख यांनी लगावला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sangliसांगली