मिरज : मिरजेतील महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली. या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले होते. महापालिकेच्यावतीने पुतळ्याची स्वच्छता करून पुतळ्यासमोर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. या घटनेबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, पोलिस निरीक्षक किरण चौगुले यांनी पुतळा परिसरास भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोर, शिंदेसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत, माजी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, माजी नगरसेवक आतहर नायकवडी, आरपीआयचे श्वेतपद्म कांबळे, शिंदसेना शहरप्रमुख विनायक सूर्यवंशी आदी पुतळ्याजवळ दाखल झाले. या घटनेबाबत महापालिका अधिकारी व पोलिसांना माहिती देण्यात आली.
एका तासात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेउपायुक्त स्मृती पाटील व महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले. पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. एका तासात या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. पोलिसांत तक्रार दिली जाईल, अशी माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची अनेक दिवसांची मागणी होती. मात्र याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रशांत लोखंडे यांनी केला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश सचिव विलास देसाई यांच्यासह विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला.
Web Summary : Desecration of a statue in Miraj sparked outrage. Authorities cleaned the statue, installed CCTV. Police investigation initiated following complaint. Protest by various organizations.
Web Summary : मिरज में एक प्रतिमा के अपमान से आक्रोश फैल गया। अधिकारियों ने प्रतिमा को साफ किया, सीसीटीवी लगाया। शिकायत के बाद पुलिस जांच शुरू। विभिन्न संगठनों द्वारा विरोध प्रदर्शन।